मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा सुविधेसाठी एसटी महामंडळाने 2 हजार 211 बसेस सोडल्या आहेत. एसटी बसेस आणि रेल्वे गाड्यामार्फत लाखोंच्या संख्येत चाकरमान्यांनी गाव गाठले आहे. मात्र, आता कोकणाकडे जाताना चाकरमान्यांना रेल्वेचा भरमसाठगर्दीचा सामना करावा लागल्याने तीच समस्या मुंबईकडे परत येताना होऊ नयेत म्हणून, चाकरमान्यांनी एसटी बसेसना पसंती दिली. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत एसटीच्या 1 हजार 453 जादा गाड्यांचे आरक्षण हाऊस फुल्ल झाले आहे.
एसटीला पसंती -
दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता रेल्वे प्रशासानांकडून प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात येतात. गणेशोत्सवाचा 3 महिन्याआधीपासून सुरू असणाऱ्या तिकिट बुकिंग प्रक्रियेतही अनेकवेळा प्रवाशांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो. तसेच तिकिट काढूनही प्रतिक्षा यादीत नाव येत असल्याने प्रवाशांना गणेशोत्सवासाठी जाताना बराच त्रास सहन करावा लागतो. मात्र, परतीच्या प्रवासासाठी हे हाल होऊ नयेत, म्हणून मुंबईकडे परतताना चाकरमान्यांनी रेल्वेपेक्षा एसटी बसेसना पसंती दिली. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत एसटीच्या 1 हजार 453 जादा गाड्यांचे आरक्षण हाऊस फुल्ल झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
1 हजार 453 एसटीचे आरक्षण -
आज घरोघरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. उद्या दीड दिवसांचे गणरायांचे विसर्जन होणार तर 14 सप्टेंबरला पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात गेल्या चाकरमान्यांनी परतीचा प्रवासाची रेल्वे आणि एसटी बस गाड्यांचे तिकीटा काढणे सुरु केले आहे. आतापर्यंत एसटीच्या 1 हजार 453 जादा गाड्यांचे आरक्षण हाऊस झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुण्याकडे जादा एसटीने जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एकूण 1 हजार 453 एसटीचे आरक्षण झाले आहे. 14 सप्टेंबरला ग्रुप आरक्षणाच्या 45 आणि 356 वैयक्तिक आणि 15 सप्टेंबरला 86 ग्रुप आरक्षणाच्या आणि 309 वैयक्तिक आरक्षणाच्या गाड्या कोकणातून मुंबई, ठाणे, पालघरला येणार आहे.
हेही वाचा - परभणीत दोन तरुणांची पुराच्या पाण्यात स्टंटबाजी; एक शेतकरी गेला वाहून