ETV Bharat / state

MMRDA चा भोंगळ कारभार : बीकेसीतील कोविड ओपन हॉस्पिटल १५ दिवसात बंद करण्याची नामुष्की - mumbai corona hospital latest news

वांद्रे (पूर्व) मध्ये स्थित या केंद्राची क्षमता १ हजार ०२६ खाटांची आहे. पैकी १८ वॉर्डमध्ये प्रत्येकी २८ खाटा याप्रमाणे ५०४ खाटांसोबत ऑक्सिजन पुरवठ्याचीदेखील सोय आहे. तर ९ वॉर्डमध्ये प्रत्येकी ५८ खाटा अशा ५२२ इतर खाटा आहेत. सोबत १० मोबाईल आयसीयू बेड आहेत. येथे १३ डॉक्टर, ८ परिचारिका, १४ वॉर्ड बॉय नेमण्यात आले आहेत. तर इतर कामकाजासाठी ७ लिपीकदेखील नेमले आहेत.

mumbai bkc 1000 bed open hospital for covid would be closed in just 15 days after inauguration
बिकेसीतील ओपन हॉस्पिटल १५ दिवसात बंद करण्याची नामुष्की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाले होते उद्गाटन
author img

By

Published : Jun 2, 2020, 5:13 PM IST

मुंबई - महानगरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए यांनी वांद्रे-कुर्ला संकुल येथे एमएमआरडीए मैदानावर सुमारे १ हजार खाटांचे खाट क्षमतेचे कोविड समर्पित आरोग्य केंद्र (डी.सी.एच.सी.) उभारले. या केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला आज १८ मे ला हस्तांतरित करण्यात आले. मात्र १५ दिवसातच हे केंद्र बंद करण्याची नामुष्की सरकार आणि पालिकेवर आली आहे.

एमएमआरडीचा भोंगळ कारभार : बीकेसीतील कोविड ओपन हॉस्पिटल १५ दिवसात बंद करण्याची नामुष्की

वांद्रे पूर्व येथील एमएमआरडीए ग्राऊंडवर सव्वालाख चौरस फूट क्षेत्रफळावर एमएमआरडीएने पंधरवड्यापेक्षा कमी कालावधीत कोविड १९ केअर सेंटर तयार केले आहे. या केंद्रात एकाचवेळी हजार रुग्णांवर उपचार करता येतील, सर्व हवामान परिस्थितीचा विचार करून हे केंद्र उभारले गेले आहे. विशेषत: पावसाळ्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत, असे एमएमआरडीए आणि पालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळ येईल या भीतीने हे केंद्र सुरू करून 15 दिवस होण्याच्या आतच बंद करावे लागले आहे. हे केंद्र उभारलेल्या जागेवर पाऊस पडला तर चिखल होईल आणि त्यामुळे रुग्णांना त्रास होईल, असे सांगत या केंद्रामधील रुग्णांना वरळी, महालक्ष्मी या याठिकाणी हलवण्यात आले आहे. यामुळे हे केंद्र उभारण्यासाठी करण्यात आलेला खर्च वाया गेल्याची चर्चा आहे.

mumbai bkc 1000 bed open hospital for covid would be closed in just 15 days after inauguration
बिकेसीतील ओपन हॉस्पिटल १५ दिवसात बंद करण्याची नामुष्की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाले होते उद्गाटन
काय आहे या केंद्रात -

या कोविड १९ केअर सेंटरचे २ मे रोजी काम सुरू होवून ते १६ मे रोजी पूर्णत्वास आले. देशातील हे पहिले असे ओपन हॉस्पिटल आहे. सर्व हवामान परिस्थितीचा विचार करून हे केंद्र उभारले गेले आहे. विशेषत: पावसाळ्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. येथे तीव्र बाधा नसलेल्या नॉन क्रिटिकल म्हणजेच सौम्य व मध्यम रोगसूचक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या ठिकाणी रूग्णांसाठी निवास, ऑक्सिजन आणि चाचणी घेण्याची सुविधा आहे. स्टोरेज सुविधेसह पॅथॉलॉजी, ईसीजी आणि एक्स-रे मशीनसह देखील सुसज्ज आहे. दररोज सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या रुग्णालयात दिले जाते. स्वच्छतागृहे, स्नानगृहे यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तर, तैनात डॉक्टरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे ३५० कामगार आणि एमएमआरडीएचे ७० अधिकार्‍यांनी अथक कामकाज करत अवघ्या १५ दिवसात हे कोविड १९ केअर सेंटर उभारले आहे.

केंद्रात किती खाटा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.