ETV Bharat / state

पुलवामा हल्ला : जुहू चौपाटीवर वाळू शिल्पातून वाहिली हुतात्म्यांना श्रद्धांजली - artist paid tribute

लक्ष्मी गौड या महिला शिल्पकाराने वाळू शिल्प बनवून वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

वाळू शिल्प
author img

By

Published : Feb 16, 2019, 10:02 PM IST

मुंबई - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्याचा निषेध देशभरातून केला जात आहे. कुठे पाकिस्तानचा झेंडा तर कुठे पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला जात आहे. तसेच जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मुंबईच्या जुहू चौपाटीवर हुतात्म्यांना एक आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. लक्ष्मी गौड या महिला शिल्पकाराने वाळू शिल्प बनवून वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

वाळू शिल्प
undefined

गुरुवारी जम्मू काश्मीर येथील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४२ जवान वीरमरण आले. एकाच वेळी ४२ जवान हुतात्मा झाल्याने देशभरात आतंकवाद्यांच्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात पाकिस्तानचे झेंडे आणि पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जात आहे.

याचवेळी मुंबईच्या जुहू चौपाटीवर लक्ष्मी गौड या महिलेने १ टन वाळूचा वापर करत शिल्प बनवून त्याद्वारे जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी सकाळी ८.३० वाजता हे शिल्प बनवण्यास सुरुवात केली, सायंकाळी ६ वाजता शिल्प बनवून तयार झाले. मी माझ्या कुटुंबीयांतर्फे या शिल्पाच्या माध्यमातून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली असल्याचे गौड यांनी सांगितले.

वाळू शिल्पाची कला मी माझे वडील मारुती कांबळे यांच्याकडून शिकले. वडिलांच्या निधनानंतर मी स्वत: वाळू शिल्प साकारू लागले. या आधी कँन्सर, गणेशोत्सव, ख्रिसमस, नव वर्ष या निमित्ताने मी गेली ११ वर्ष वाळू शिल्प साकारत आली आहे. पठाणकोट, सियाचीन हल्ल्यानंतर श्रद्धांजली वाहण्यासाठीही वाळूशिल्प बनवल्याचे गौड यांनी संगितले.

कुटुंबियांच्या आणि मैत्रिणींच्या मदतीने साकारता आले शिल्प

माझे पती वडापावची गाडी चालवतात. त्यामधून येणाऱ्या उत्पन्नामधून तसेच मैत्रिणींकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीमधून रंग विकत घेतल्याचे गौड यांनी सांगितले. वाळूशिल्प बनवण्यासाठी १ टन वाळू लागली. माझ्या या कामात कुटुंबाचा आणि मैत्रिणींची साथ लाभत असल्याचे लक्ष्मी गौड यांनी सांगितले.

Intro:मुंबई - (विशेष बातमी)
पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्याचा निषेध देशभरात केला जात आहे. कुठे पाकिस्तानचा झेंडा तर कुठे पाकिस्तानचा पुतळा जाळून निषेध केला जात आहे. मुंबईच्या जुहू चौपाटीवर मात्र एक आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. लक्ष्मी गौड या महिलेने वाळू शिल्प बनवून शाहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. Body:गुरुवारी जम्मू काश्मीर येथील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आतंकवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० जवान शहिद झाले. एकाच वेळी ४० जवान शहिद झाल्याने देशभरात आतंकवाद्यांच्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात पाकिस्तानचे झेंडे आणि पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जात आहे.

याच वेळी मुंबईच्या जुहू चौपाटीवर लक्ष्मी गौड या महिलेने एक टन वाळूचा वापर करत शिल्प बनवून त्याद्वारे शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. सकाळी ८.३० वाजता हे शिल्प बनवण्यास सुरुवात केली, सायंकाळी सहा वाजता हे शिल्प बनवून तयार झाले आहे. मी माझ्या कुटुंबीयांतर्फे या शिल्पाच्या माध्यमातून शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली असल्याचे गौड यांनी सांगितले.

वाळू शिल्पाची कला मी माझे वडील मारुती कांबळे यांच्याकडून शिकले. वडिलांच्या निधनानंतर मी स्वता वाळू शिल्प साकारू लागले. या आधी कँसर, गणेशोत्सव, ख्रिसमस, नव वर्ष या निमित्ताने मी गेली ११ वर्ष वाळू शिल्प साकारत आली आहे. पठाणकोट, सियाचीन हल्ल्यानंतर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही वाळूशिल्प बनवल्याचे गौड यांनी संगितले.

यांच्या मदतीने शिल्प -
माझे पती वडापावची गाडी लावतात. त्यामधून येणाऱ्या उत्पन्नामधून तसेच मैत्रिणीकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमधून रंग विकत घेतले जातात. शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वाळूशिल्प बनवण्यासाठी एक टन वाळू लागली ती वाळू एकत्र करण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला. त्यासाठी १५०० रुपये खर्च आले ते माझ्या पतींनी दिले. माझ्या या कामात कुटुंबाचा आणि मैत्रिणींची साथ लाभत असल्याचे लक्ष्मी गौड यांनी सांगितले.

सोबत वाळू शिल्पाचे व्हिज्युअल आणि गौड यांचा बाईट पाठवला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.