मुंबई : आरोपीने या नोटा दोन फळांच्या कार्टूनमध्ये लपवल्या होत्या. प्रवाशाला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्याने सांगितले की, खतीब रहीम असे आरोपीचे नाव आहे. तो कर्नाटकचा रहिवासी असून दुबईला जात होता. चौकशीदरम्यान खतीबने उघड केले की, त्याला सैफुल्ला आर या त्याच्या नातेवाईकाने बनावटी चलन पोहोचवण्यास सांगितले होते. अधिकारी आता त्याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहे.
प्रवाश्याविरुद्ध गुन्हा दाखल : प्रोफाइलिंगनंतर रहीमला अधिकाऱ्यांनी संशयावरून अडवले. मोठ्या प्रमाणात परदेशी नोटांची तस्करी केल्याप्रकरणी त्याच्यावर सीमाशुल्क कायदा आणि विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोकेनचा मोठा साठा जप्त: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा सोमवारी जप्त करण्यात आला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्सने एका भारतीय प्रवाशाला अटक केली. जो डफल बॅगमध्ये 28.10 कोटी रुपयांचे सुमारे 2.81 किलो कोकेन घेऊन जात होता. या प्रवाशाला सोशल मीडियावर भेटलेल्या व्यक्तींनी अंमली पदार्थ घेऊन जाण्याचे आमिष दाखविल्याचे तपासात उघड झाले आहे. कस्टम अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रवाशाला तस्करीसाठी हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आले होते.
१५.९६ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त : चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ३१.२९ कोटी रुपये किमतीचे ४.४७ किलो हेरॉईन आणि १५.९६ कोटी रुपये किमतीचे १.५९६ किलो कोकेन जप्त केले होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क (कस्टम) अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कोकेन आणि हेरॉईन जप्त केले होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली होती.
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध मोहीम : सीमा शुल्क अधिकाऱ्याने सांगितले होते की, 31.29 कोटी रुपये किमतीचे 4.47 किलो हेरॉईन आणि 15.96 कोटी रुपये किमतीचे 1.596 किलो कोकेन कागदपत्रांच्या फोल्डरच्या कव्हरमध्ये कपड्याच्या बटणांमध्ये लपवले होते. आम्ही अंमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात मोहीम सुरू केली आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला, असे कस्टम अधिकारी म्हणाले. आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा : Thane Crime : दारू पार्टीत कौटुंबिक वादातून धारदार चाकूने कापले सहकाऱ्याचे लिंग