मुंबई : Mumbai Airport : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये अत्यंत गजबजलेले एक विमानतळ आहे. 2023 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये एक कोटी 20 लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला. ही आकडेवारी म्हणजे कोविडच्या काळातील आकडेवारीच्या तुलनेत 109 टक्क्यांनी जास्त आहे.
प्रवाशांची संख्या 33 टक्क्यांनी वाढली : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटी वीस लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी वाहतूक केलेली आहे. ही वाहतूक 2023 या वर्षीच्या मागील त्रैमासिक काळामधील आहे. ही आकडेवारी मागच्या वर्षीच्या त्रैमासिक पेक्षा तुलनेने 33 टक्के अधिक झालेली आहे आणि 2019 च्या म्हणजेच कोरोना महामारीच्या काळापेक्षा 109 टक्क्याने अधिक अशी ठसठशीतपणे समोर आलेली आहे.
तिमाहीतील वाढ 21% इतकी : या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 15 सप्टेंबर 2023 रोजी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 1 लाख 58 हजार 209 प्रवाशांनी एकाच दिवसात येथून उड्डाणही केले आणि येथे उतरले देखील आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावर येथून वाहतूक करण्याबाबत जी आकडेवारी आली तिने यापूर्वीच्या आकडेवारीला मागे टाकले आहे. त्यामध्ये 2022 च्या तुलनेमध्ये 2023 च्या या तिसऱ्या तिमाहीत उल्लेखनीय वाढ झालेली आहे आणि ही वाढ म्हणजे 21% इतकी आहे.
'या' विमानतळानंतर सर्वाधिक वाहतूक करणारे विमानतळ : 2022 च्या तुलनेमध्ये या तिमाहित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने लंडनचे विमानतळ तसेच सिंगापूरच्या विमानतळानंतर प्रवाशांची सर्वाधिक वाहतूक करणारे विमानतळ म्हणून विक्रम प्रस्थापित केला आहे. तर देशांतर्गत दिल्ली, बंगलोर आणि चेन्नई या ठिकाणी तीस लाख 24 हजार एवढी प्रवासी संख्या नोंदवली गेली आहे. ही प्रवासी संख्या 2022 मध्ये जी प्रवासी संख्या नोंदवली गेली होती तिच्यापेक्षा 31 टक्क्यांनी वाढलेली आहे. तर ऑगस्ट 2023 पर्यंत 43 लाख 29 हजार 749 प्रवाशांची नोंद छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेली आहे. अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्राधिकरणाकडून कळवली गेली आहे.
हेही वाचा:
- Mumbai Plane Crash : मुंबई विमानतळावर खासगी विमान धावपट्टीवर घसरलं, विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित
- Mumbai Customs Seize Diamonds: मुंबई विमानतळावर हिरे तस्करी, आरोपीने हिरे लपविण्यासाठी लढवली 'ही' अनोखी शक्कल
- Mumbai High Court : मुंबई विमानतळ परिसरातील 48 इमारतीचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे न्यायालयाचे आदेश