ETV Bharat / state

Mumbai Air Pollution: मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली; वायू प्रदूषणामुळं लहान मुलांना धोका? अशी घ्या काळजी - Dangerous Diseases In Children

Mumbai Air Pollution : मुंबईत यंदा दिवाळीपूर्वीच हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. आजूबाजूला विषारी हवा आणि धुक्यामुळं लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय. सततच्या वाढत्या प्रदूषणामुळं लोकांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय.

Mumbai Air Pollution
वायू प्रदूषण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 9:24 PM IST

माहिती देताना डॉ. अविनाश भोंडवे

मुंबई Mumbai Air Pollution : मुंबईत मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल आणि हवेतील गुणवत्ता कमालीची खालावली आहे. त्यामुळं स्वाभाविकपणे प्रदूषणात वाढ होत आहे. तसेच अजून थंडीची तीव्रता वाढली नसली तरी, हवेतील गुणवत्ता स्तर चिंताजनक नोंदवण्यात येत आहे. सध्याच्या वातावरणामुळं अनेक आजार होण्याची शक्यता आहे. दमा, श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केलं आहे. मुंबई तसेच पश्चिम व मध्य उपनगरामध्ये म्हणजे कल्याण, डोबिंवली, बदलापूर, अंबरनाथ, मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, ठाणे आदी हवेतील गुणवत्ता खालावली आहे. यामुळं प्रदूषणात वाढ होत असून, वायुतील प्रदूषणामुळं मुख्यत: लहान मुलांना व्हायरसचा धोका (Dangerous virus) असल्याचं देखील आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

वायू प्रदूषणामुळं मुलांना व्हायरचा धोका : यावर्षी दिल्लीसह मुंबई आदी शहरात हवेतील गुणवत्ता खालावली आहे. प्रदूषणातील वायू, विषारी हवा व धुक्यामुळं वृद्ध आणि लहान मुलांच्या आजारात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रदूषणातील वायुमुळं श्वसन, घसा तसेच श्वासोच्छवासाचा त्रास मुलांना होऊ शकतो. परिणामी मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊन विविध आजार म्हणजे न्यूमोनिया, ब्राँकायटिस, सर्दी, दमा आणि हृदयाबाबत आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच यामुळं मुलांमध्ये उच्च रक्तदाब, हवेतील नायट्रोजन, सल्फरसारखे विषारी वायू मुलांच्या मेंदूपर्यंत पोहोचून त्यांचा मानसिक आणि बौद्धिक विकास मंदावतो, तसेच शरीरावर देखील परिणाम होतो, असं आरोग्यतज्ज्ञ अविनाश भोंडवे यांनी म्हटलं आहे.

काय काळजी घ्याल?
- मुलांना शाळेत पाठवताना मास्कचा वापर करावा
- जेवतेवेळी किंवा काही खातेवेळी हात स्वच्छ धुवून घ्या
- ज्या ठिकाणी धूर किंवा इमारतीचे काम सुरु आहे, तिथे जाणे टाळा
- खोकला, श्वसनाचा त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
- मुलांना दररोज वाफ द्या
- घरात एअर प्युरिफायर किंवा योग्य वेंटिलेशनचा वापर करा, जेणेकरुन घरातील हवा स्वच्छ राहिल

काय आहे मुंबईत हवेची गुणवत्ता? : मुंबईतील अनेक भागात हवेतील गुणवत्ता खालावल्याचं चित्र आहे. यामुळं शहराला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. मुंबईतील कुलाबा, बीकेसी आणि चेंबूर परिसरात हवेचा स्तर वाईट नोंदवण्यात आला. याव्यतिरिक्त माझगाव, बोरिवली, अंधेरी, मालाड, भांडुप, आणि नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. सोमवारी मुंबईतील हवेचा स्तर वाईट नोंदवण्यात आला. चेंबूर - २९९ एक्यूआय, बीकेसी - २५९ एक्यूआय आणि कुलाबा - २२६ एक्यूआय एवढा हवेचा स्तर नोंदवण्यात आला आहे.

हवा गुणवत्तेतील फरक कसा समजतो?
० ते ५० एक्यूआय = चांगली
५१ ते १०० एक्यूआय = समाधानकारक
१०१ ते २०० एक्यूआय = मध्यम
२०१ ते ३०० एक्यूआय = खराब
३०१ ते ४०० एक्यूआय = अति खराब
४०१ ते ५०० एक्यूआय = तीव्र

हेही वाचा -

  1. Mumbai Air Pollution Issue: प्रदूषणापासून मुंबईला वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे कठोर आदेश
  2. Mumbai Air Quality Index : मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ; आजार बळवण्याची शक्यता, 'अशी' घ्या काळजी
  3. Air Pollution In Mumbai : उपनगरांच्या घशाला कोरड; तर रस्ते धुण्यासाठी पालिका वापरणार 121 टँकर पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.