मुंबई : केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी असलेला मुंबई अहमदाबाद हा बुलेट ट्रेन प्रकल्प ( Mumbai Ahmedabad Bullet Train project ) प्रगतिपथावर असल्याचे सांगितेल जात आहे. मात्र मात्र वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी बुलेट ट्रेनच्या रेल्वे स्थानकाचे काम अद्यापही सुरू झाले नसल्याचे दिसून आले आहे. ते केवळ कागदावरच ( work at BKC Complex only on paper ) असल्याचे सांगण्यात येत आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणीची स्थिती : केंद्र शासनाकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाला ( Bullet Train project ) गती दिली जात आहे. आतापर्यंत राज्यात 98 टक्के टक्के भूसंपादन करून कामे वेगाने झाली. डिसेंम्बरपर्यंत राज्यातील बुलेट ट्रेन भौतिक प्रगती काम 13.26 टक्के काम झाले आहे. तर दोन्ही राज्यात 98 टक्के भूसंपादन काम पूर्ण झाले आहे. ह्या पार्श्वभूमीवर जपानचे राजदूत हिरॉईशी एफ सुझुकी यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला भेट दिली. त्याबाबतचे ट्विट राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळ यांनी नुकतच केले. भूसंपादनाचे काम इतक्या वेगाने होत आहे. परंतु मुंबईमधील बुलेट ट्रेन प्रकल्पाचे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी मात्र कोणतही प्रकारच काम झालेले नाही. जागेवर जाऊन पाहणी केली असता, साधी एक सुद्धा कुदळ देखील तिथे मारलेले दिसत नाही.
बुलेट ट्रेन रेल्वे मार्गावरील स्थानक : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण ११ रेल्वे स्थानक आहेत. मुंबई बिकेसी हे सुरुवातीचे स्थानक नंतर ठाणे मात्र येथे जमिनीच्या अर्थात समुद्राच्या खालून भुयारातून मार्ग जाईल. मग विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद आणि अहमदाबाद असे स्थानक असणार आहेत. यामध्ये वांद्रे कुर्ला संकुलात संकुल जिथे भले मोठे मैदान आहे. विविध सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि कोरोना महामारीच्या काळामध्ये तात्पुरत्या स्वरूपात येथे मोठे रुग्णालय उभारले होते. त्याच जागेवर बुलेट ट्रेनचे प्रकल्पाचे काम होणार आहे. मात्र ईटीव्ही भारत वतीने घटनास्थळी भेट दिली असता अद्याप येथे साधी कुदळ मारलेली नाही किंवा एक खड्डा देखील खोदलेला दिसत नाही.याला दुजोरा रेल्वे गतिशक्ती महामंडळ प्रवक्त्यांनी देखील दिला.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते अहमदाबाद : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा 508 किलोमीटरचा मार्ग असेल. मुंबईमधील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट महामंडळाची कार्यालय आहे. भारत सरकारची, राज्य सरकारची विविध महामंडळे त्यांची देखील कार्यालय आहे. तसेच इतर देशांचे काही महत्त्वाचे शासकीय कार्यालय देखील याच भागामध्ये आहे. त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुल आणि त्याच्या मैदानावर बुलेट ट्रेनचे रेल्वे स्थानकाचे काम अद्यापही सुरू झाले नसल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आश्चर्य व्यक्त केले. एकूण बुलेट ट्रेन साठीचे जे क्षेत्र आहे ते 508 किलोमीटर आहे. त्यापैकी गुजरातमध्ये 348 किलोमीटर दादर नागरा हवेली मध्ये चार किलोमीटर अवघे आणि 156 किलोमीटर मार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. दादर नागरा हवेली येथे भूसंपादन 100 टक्के काम पूर्ण झाले आहे.महाराष्ट्रात 98 टक्के भूसंपादन झाले असल्याचे महामंडळाने सांगितले आहे. बुलेट ट्रेन ही ताशी 320 किलोमीटर धावू शकते आमदाबाद ते मुंबई केवळ तीन तासात ही ट्रेन टप्पा गाठू शकते. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असल्यामुळे या ट्रेनचा खर्च देखील अफाट आहे.
प्रकल्पाला जापान सरकारचे अर्थसहाय्य : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत 1.08 लाख कोटी रुपये आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार 10,000 कोटी रुपये, गुजरात सरकार 5,000 कोटी रुपये आणि महाराष्ट्र सरकार 5,000 कोटी रुपये नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला देणार आहे. उर्वरित रक्कम जपानकडून 0.1 टक्के व्याजदराने कर्ज घेतली जाईल. जापान सरकार दर महिन्याला याबाबत आढावा घेत असते आणि त्यानंतर याबाबतचा निधी भारत सरकारकडे हस्तांतरित करत असते.
भुयारातून जाणार बुलेट ट्रेन मार्ग : पुढील काही वर्षात समुद्राखालील भुयारातून बुलेट ट्रेन धावणार असा दावा केंद्र शासनाने केला आहे. यासाठीची तयारी सुरू आहे. बीकेसी ते शिळफाटा या मार्गावरुन २१ किलोमीटर लांबीचा समुद्राच्या खालूम भुयारी मार्ग बनवण्यासाठीची तयारी देखील वेगात सुरू आहे. असा दावा गतिशक्ती महामंडळाने केला आहे.
पहिला अंडरवॉटर भुयारी रेल्वे मार्ग : नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनुसार देशातील पहिला अंडरवॉटर भुयारी मार्ग असेल. बीकेसीच्या या अंडरग्राउंड स्टेशनमध्ये ६ प्लॅटफॉर्म असतील, ज्याची लांबी ४२५ मीटर असेल. हाय स्पीड ट्रेनसाठी १६ डब्बे असतील. १६ डब्ब्यांनुसार प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे. बीकेसी स्टेशनच्यावर आयएफएससी बनवण्यात येणार आहे. यासाठी इमारतीची उंची ६० मीटरपर्यंत असणार आहे.
समुद्राच्या तळातून भुयारी मार्गासाठी सर्वेक्षण : एरियल लिडर टोपोग्राफिक सर्वेक्षण लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग LiDAR हा भारतातील रेल्वे प्रकल्पात प्रथमच वापर केला जाणार. अचूक सर्वेक्षण डेटा देण्यासाठी हे तंत्र लेझर डेटा, जीपीएस डेटा, फ्लाइट पॅरामीटर्स याचा वापर केला जाणार आहे. हेलिकॉप्टर याद्वारे लेझर किरण सोडले जातील आणि समुद्राच्या तळापर्यंत विविध सर्वेक्षण केले जातील.
राष्ट्रीय रेल्वे गतिशक्ती महामंडळाचा खुलासा : राष्ट्रीय रेल्वे गतिशक्ती महामंडळ दिल्ली यांना ईटीव्ही भारत वतीने विचारले असता त्यांनी खुलासा केला की, या ठिकाणी बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे की लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण व्हावा. मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी काम सुरू व्हावे मात्र या क्षणी कोणतेही काम सुरू झालेले नाही. याचे काय कारण आहे ह्या ईटीव्हीच्या प्रश्नावर उत्तरादाखल बुलेट ट्रेन महामंडळ राष्ट्रीय प्रवक्ते सुषमा गौर म्हणाल्या की, या संदर्भातील सर्व तांत्रिक निविदा अद्यापही परिपूर्ण रीतीने जाहीर झालेल्या नाही त्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र तांत्रिक निविदा जाहीर होतील. पुढील काही काळात आणि तांत्रिक निविदाचे काम झाल्यावर त्यानंतर आर्थिक निविदाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि आर्थिक निविदाची प्रक्रिया पूर्ण झाली की मग वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन रेल्वे स्थानकाचे काम सुरू होईल. अद्याप तरी या ठिकाणी बुलेट ट्रेन बाबत रेल्वे स्थानकाचे कोणतेही काम सुरू झालेले नाही.