मुंबई : अनेकदा मुंबई पोलीसांनी नागरिकांना जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृतीपर अशा लिंकवर क्लिक करण्यापासून सावध केले आहे. त्या लिंकद्वारे बँक ग्राहकांना त्यांची गोपनीय माहिती विचारत आहेत. सायबर चोर म्हणजेच फसवणूक करणारे ग्राहकांना त्यांच्या KYC/PAN कार्डचे तपशील अपडेट न केल्यामुळे त्यांचे बँक खाते ब्लॉक करण्यात आले आहे. असे सांगत फिशिंग लिंकसह बनावट एसएमएस पाठवत आहेत. या लिंकवर क्लिक केल्यानंतर, अशा लिंक ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या बनावट वेबसाइटवर घेऊन जातात जिथे त्यांना त्यांचा ग्राहक आयडी, पासवर्ड आणि इतर गोपनीय तपशील भरण्यास भाग पाडले जाते.
सायबर क्राईमचा बळी : अशाच प्रकारे फसवणुकीची तक्रार करणाऱ्या ४० तक्रारदारांमध्ये श्वेता मेमनचा देखील समावेश होता. श्वेता मेमनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या गुरुवारी तिने बनावट मेसेजमधील एका लिंकवर क्लिक केले होते. तो मेसेज बँकेने पाठवला असेल असे तिला वाटले होते. कारण बँकेने मेसेज पाठवल्यासारखे लिंकद्वारे एसएमएस पाठवून भासवण्यात येते. लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडलेल्या पोर्टलमध्ये तिने तिचा ग्राहक आयडी, पासवर्ड आणि ओटीपी टाकला. त्यानंतर तिला एका महिलेचा कॉल आला होता, तिने बँक अधिकारी म्हणून ओळख करून दिली होती. त्या महिलेने श्वेता मेमनला तिच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला दुसरा ओटीपी क्रमांक सांगण्यास सांगितले. त्यानंतर तिच्या बँक खात्यातून ५७ हजार ६३६ रुपये डेबिट झाले. दरम्यान ती श्वेता मेनन मी नसुन दुसरीच कोणी आहे असे अभिनेत्री श्वेताने स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीसांनी केले आवाहन: अशाप्रकारे अनेक नागरिक बोगस लिंकवर क्लिक करून हजारो लाखो रुपये गमवून बसतात. त्यासाठी मुंबई पोलीस आणि त्या नागरिकांना अशा लिंकवर क्लिक करू नका असे आवाहन करत आले आहेत. बँक संदर्भात काहीही मेसेज अथवा लिंक आल्यास प्रथम नागरिकांनी संबंधित बँकेला संपर्क साधून त्याविषयी माहिती जाणून घ्या. त्यानंतरच पुढचे पाऊल उचला. ताबडतोब आलेल्या लिंकवर क्लिक करू नका, असे मुंबई पोलीसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: Mumbai Crime News 66 लाखांच्या ईसिगारेट मस्जिद बंदर परिसरातून जप्त गुन्हे शाखेची कारवाई