ETV Bharat / state

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबईकर आज रस्त्यावर उतरणार; मुंबई पोलीस सज्ज

दुसरीकडे टिसचे विद्यार्थी त्याचबरोबर छात्रभारती आणि अनेक विद्यार्थी संघटना उद्याच्या आंदोलनात सहभागी होणार असून हे आंदोलन शांततेत पार पडावं, कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही. याची काळजी आपण स्वतः घ्यावी, असे आवाहन विद्यार्थी संघटनाकडून करण्यात आले आहे.

mumabikar-will-protest-against-caa-today
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबईकर आज रस्त्यावर उतरणार
author img

By

Published : Dec 19, 2019, 8:19 AM IST

Updated : Dec 19, 2019, 9:24 AM IST

मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशभरात लागू झाल्यापासून संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी या कायद्याचा निषेध करण्यासाठी आंदोलने होत आहेत. दिल्लीमध्ये या कायद्याच्या विरोधात तीव्र आंदोलन झाले दरम्यान यामध्ये विद्यार्थी आणि पोलिसामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, मुंबईतसुद्धा या कायद्याच्या विरोधात मोठे आंदोलन होणार आहे. आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मुंबईत अनेक जण रस्त्यावर उतरणार आहेत. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात आज हे आंदोलन होणार आहे.

ऑगस्ट क्रांती मैदानात होणाऱ्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असून त्यासाठी सीआरपीएफ, राज्य राखीव दल, आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी सुद्धा या सगळ्यावर जातीने लक्ष घालतील, असे मुंबई पोलिसाकडून सांगण्यात आले आहे. जिथे-जिथे आंदोलने होतील त्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोन कमेऱ्यांची नजर असणार आहे. तर उद्याची सर्व आंदोलने शांततेत पार पडावी यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष काळजी घेतलेली आहे.

दुसरीकडे टिसचे विद्यार्थी त्याचबरोबर छात्रभारती आणि अनेक विद्यार्थी संघटना उद्याच्या आंदोलनात सहभागी होणार असून हे आंदोलन शांततेत पार पडावं, कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही. याची काळजी आपण स्वतः घ्यावी, असे आवाहन विद्यार्थी संघटनाकडून करण्यात आले आहे.

CAB विरोधात मुंबईकर आज रस्त्यावर उतरणार

बॉलिवूड आणि इतर क्षेत्रातील सुद्धा कलाकार या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि फरहान अखतर स्वतः आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिलीय. देशभरात आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता उद्या मुंबईत होणारी आंदोलने शांततेत पार पडावीत यासाठी पोलीस सज्ज आहेत.

Intro:नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशभरात लागू झाल्यापासून संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी या कायद्याचा निषेध करण्यासाठी आंदोलने होत आहेत..दिल्लीमध्ये या कायद्याच्या विरोधात तीव्र आंदोलन झाले दरम्यान यामध्ये विद्यार्थी आणि पोलिसांच्यात संघर्ष पाहायला मिळाला मात्र मुंबईतसुद्धा या कायद्याच्या विरोधात मोठे आंदोलन होणार आहे..उद्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मुंबईत अनेक जण रस्त्यावर उतरले असून मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात मोठे आंदोलन होणार आहे..Body:ऑगस्ट क्रांती मैदानात होणाऱ्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असून त्यासाठी सीआरपीएफ, राज्य राखीव दल, आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी सुद्धा या सगळ्यावर जातीने लक्ष घालतील असे मुंबई पोलिसाकडून सांगण्यात आले आहे...जिथे जिथे आंदोलने होतील त्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोन कमेऱ्यांची नजर असणार आहे तर उद्याची सर्व आंदोलने शांततेत पार पडावी यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष काळजी घेतलेली आहे..
दुसरीकडे टिस चे विद्यार्थी त्याचबरोबर छात्रभारती आणि अनेक विद्यार्थी संघटना उद्याच्या आंदोलनात सहभागी होणार असून हे आंदोलन शांततेत पार पडावं कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची काळजी आपण स्वतः घ्यावी असे आवाहन विद्यार्थी संघटनाकडून करण्यात आले आहे...
Conclusion:बॉलिवूड आणि इतर क्षेत्रातील सुद्धा कलाकार या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे..अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि फरहान अखतर स्वतः आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिलीय. देशभरात आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता उद्या मुंबईत होणारी आंदोलने शांततेत पार पडावीत यासाठी पोलीस सज्ज आहेत...

(बाईट - प्रणय अशोक, पोलीस उपायुक्त)
Last Updated : Dec 19, 2019, 9:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.