मुंबई - दिवाळीत हिंदू वर्ष अर्थ नवीन विक्रम संवत्सराची सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरातील व्यापारी धन आणि समृद्धीचे प्रतिक असलेल्या देवी लक्ष्मीची पुजा करून नवीन खाते सुरू करतात. त्याच पद्धतीने भारतीय शेअर बाजाराकडून या परंपरेचे पालन करत मुहूर्त ट्रेडिंग करतात. आज (दि. 4) याचे उद्घाटन अभिनेत्री भाग्यश्रीच्या हस्ते करण्यात आले. आता ट्रेडिंग सुरू झाले आहे. पैसे गुंतवा आणि पैसे कमवा, असे म्हणत तिने उद्घाटन केली. यावेळी बीएसईचे संचालक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान उपस्थित होते. पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला असून तो 60 हजारर 111 अंकावर गेला आहे. निफ्टी 101 अंकांनी वधारुन 17 हजार 17 हजार 931 अंकावर गेला आहे.
गुजराती व मारवाडी यांच्यासाठी हा खुप महत्वाचा दिवस -
यावेळी चौहान म्हणाले, आजचा दिवस गुजराती व मारवाडी समाजासाठी महत्त्वाचा आहे. आमच्यासाठी आज वर्षाचा शेवटचा दिवस असतो. पुढील वर्ष असेच चांगले जावे, अशी इच्छा आहे. जेव्हापासून बीएसइची स्थापना झाली तेव्हापासून हा कार्यक्रम सुरू झाला.
पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला
मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसई आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करतात. लक्ष्मीपूजनादिवशी शेअर बाजाराला सुटी असली तरी मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी बाजारात फक्त 1 तास ट्रेडिंग केले जाते. आज ट्रेडिंग सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला. सेन्सेक्स आणि निफ्टीने नव्या वर्षाची सुरुवात दणक्यात केल्याने गुंतवणूकदार आणि शेअर दलालांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या सेन्सेक्स 359 अंकांनी वधारला असून तो 60 हजार 111 अंकावर गेला आहे. निफ्टी 101 अंकांनी वधारून 17 हजार 931 अंकावर व्यवहार करत आहे.
काय आहे महत्त्व.. ?
गुंतवणुकदारांना एका तासासाठी विशेष व्यापारी खिडकी शेअर खरेदी व विक्री करण्यासाठी सुरू केली जाते. त्याला मुहूर्त व्यापार (ट्रेडिंग) म्हटले जाते. हा दिवस शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. इक्विटी, इक्विटी फ्यूचर्स आणि कमोडिटीजसाठी 4 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading Session) सत्र आयोजित होणार आहे.
यंदा संवस्तर 2078 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. शेअर बाजारात या दिवशी सुख आणि समृद्धी येत असल्याचे मानले जाते. कोरोनाच्या काळातही शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने वधारला आहे.
नवीन वर्षाची सुरुवातही दिवाळीपासून होते. भारतीय परंपरेनुसार, देशाच्या बर्याच भागात दिवाळीतच नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात होते. या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी लक्ष्मी पूजनच्या मुहूर्तावर शेअर्स आणि कमोडिटी बाजार खुले राहणार आहेत. मुहूर्त ट्रेडिंग (Live Trading Session Time) एका तासासाठी खुले राहणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर ट्रेडिंगसाठी विशेष सत्र आयोजित केले जाते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आर्थिक भरभराटीसाठी ही पूजा करून शेअर बाजारातील व्यवहार सुरू ठेवले जातात.
हे ही वाचा - मुंबई पोलिसांनी आदिवासी पाड्यात जाऊन साजरी केली दिवाळी