ETV Bharat / state

समृद्धी महामार्ग : 19 पैकी पहिल्या टप्प्यातील 8 टाऊनशिपचा लवकरच होणार विकास

समृद्धी महामार्गातील 19 पैकी पहिल्या टप्प्यातील 8 टाऊनशिपचा विकास लवकरच होणार आहे. यातील 6 टाऊनशिपसाठी जून 2021मध्ये पूर्ण जमीन संपादन होणार आहे.

Mumbai–Nagpur expressway
समृद्धी महामार्ग
author img

By

Published : Oct 9, 2020, 6:06 PM IST

मुंबई - मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पात 19 टाऊनशिपचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) 19पैकी 8 टाऊनशिपचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील वर्षी जूनपासून 8 पैकी 6 टाऊनशिपसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर टाऊनशिपच्या विकासाला सुरुवात होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. या 19 टाऊनशिपमुळे समृद्धी माहामार्गालगतच्या परिसराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. हा परिसर अ‌ॅग्रीक्लचरल आणि इंडस्ट्रीयल हब बनणार असल्याचा दावा यानिमित्ताने केला जात आहे.

Mumbai–Nagpur expressway
समृद्धी महामार्ग
मुंबई ते नागपूर 701 किमीचा समृद्धी माहामार्ग बांधण्याचे काम वेगात सुरू आहे. या प्रकल्पाचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील पहिला 500 किमीचा नागपूर ते शिर्डी टप्पा 1 मेमध्ये सुरू होणार आहे. तर संपूर्ण मार्ग मे 2022मध्ये सुरू होणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जात असताना आता एमएसआरडीसीने या प्रकल्पातील टाऊनशिप प्रकल्पाच्या कामाला वेग दिला आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात येणार आहे. तर या मार्गालगतच्या परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीच 19 टाऊनशिप उभारण्यात येणार आहेत. सिडकोप्रमाणे एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण म्हणून 19 टाऊनशिपचा विकास करणार आहे. या टाऊनशिपसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. या जमिनीवर शाळा, रस्ते, गार्डन, समाज मंदिर, वीज, पाणी, निवासी-व्यावसायिक जागा अशा बाबी विकसित केल्या जाणार, असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली. पहिल्या टप्प्यात वर्ध्यातील विरुल आणि केलझार, बुलढाण्यातील सावरगाव, मेहकर, औरंगाबादमधील हडस पिंपळगाव, घाईगव, बबतारा आणि ठाण्यातील फुलगाळे या 8 टाऊनशिपचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तेव्हा आता या 8 पैकी 6 टाऊनशिपच्या जमीन संपादनाचे काम सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांशी बोलणी-चर्चा सुरू आहे. त्यांना योग्य आणि चांगला मोबदला देण्यात येत आहे. तर शेतकरीही या प्रकल्पाला होकार देत आहेत. 60 ते 70 टक्के जमीन संपादन लवकरच होण्याची शक्यता आहे. 100 टक्के संपादन जून 2021मध्ये पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांची संमती, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार नाहीत, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.
  • पहिल्या टप्प्यातील 8 टाऊनशिपची नावे पुढीलप्रमाणे -
  1. विरुल-वर्धा
  2. केलझार-वर्धा
  3. सावरगाव-बुलढाणा
  4. मेहकर- बुलढाणा
  5. हडस पिंपळगाव औरंगाबाद
  6. घाईगव-औरंगाबाद
  7. बबतारा -औरंगाबाद
  8. फुलगाळे -ठाणे
  • दुसऱ्या टप्प्यातील 11 टाऊनशिपची नावे पुढीलप्रमाणे

9. हिंगणा-नागपूर
10. धामणगाव-अमरावती
11. नांदगाव-अमरावती
12. कारंजा-वाशीम
13. मंगलूरपिर-वाशिम
14. मालेगाव-वाशिम
15. जामवाडी-जालना
16. सावली विहार अहमदनगर
17. कासगव-ठाणे
18. लेनाड-ठाणे
19. मौजे चिंचवली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.