मुंबई - राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींवरून नवनवीन गोष्टी घडत आहेत. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी अचानक भाजपशी जुळणी करून घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही काही दिवसांआधी आपल्या व्हॉट्सअपवरील स्टेटस बदलून याबबत नाराजी व्यक्त केली होती. तर, आता त्यांनी आपल्या ट्विटरवरून देखील युवाप्रमुख आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यासमवेतचा फोटो टाकत आपण एकत्र असल्याचे सांगितले.
-
With Aaditya Thackeray (@AUThackeray) and Rohit Pawar (@RohitPawarOffic) pic.twitter.com/VzFNjpNb3W
— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">With Aaditya Thackeray (@AUThackeray) and Rohit Pawar (@RohitPawarOffic) pic.twitter.com/VzFNjpNb3W
— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2019With Aaditya Thackeray (@AUThackeray) and Rohit Pawar (@RohitPawarOffic) pic.twitter.com/VzFNjpNb3W
— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2019
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या पेचावरून राज्यातील राजकिय घडामोडींनी वेगळे वळण घेतले आहे. शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीला मोठा झटका बसला. अजित पवार यांनी या निर्णय त्यांचा स्वत:चा असून पक्ष याला समर्थन करत नसल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले होते. यानंतर, पवार कुटूंबातील आणि पक्षातील कलह परत एकदा पुढे आले.
हेही वाचा - सत्तापेच LIVE : आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
दरम्यान, काल रविवारी सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटरवर संजय राऊत, युवाप्रमुख आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्याबरोबरचा फोटो टाकत आपण एकत्र असल्याचे सांगितले. हे ट्विट संजय राऊत यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटवर रिट्विट केले. तर, आदित्य ठाकरे यांनीही सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याबरोबरचा फोटो 'महाराष्ट्रासाठी आम्ही सर्व एकत्र' अशा कॅप्शनसोबत आपल्या अकाउंटवर शेयर केला आहे. यावरून अजित पवार यांनी जरी भाजपशी जवळीक केली असली तरी आम्ही एकत्रच आहोत असे या ट्विटवरून त्यांनी स्पष्ट केल्याच दिसत आहे.
हेही वाचा - अजितदादांनी साहेबांचा निर्णय मान्य करुन स्वगृही परत यावं - रोहित पवार
या सोबतच त्यांनी आणखी एक ट्विट जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आणि आपल्या वाचकांसाठी प्रत्येक बातमी वेळेत पोहोचवणाऱ्या पत्रकारांसाठी केले आहे. यात त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो, ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या.' असे म्हणत त्यांनी पत्रकारांविषयीची आपली भावना व्यक्त केली. हे ट्विट त्यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून केले आहे. त्यांच्या या ट्विटला अनेकांनी लाईक केले असून हजारोंनी ते रिट्विटही केले आहे.
-
माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो,
— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या. pic.twitter.com/HrXTkaw39L
">माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो,
— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2019
ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या. pic.twitter.com/HrXTkaw39Lमाध्यमातील मित्र- मैत्रिणींनो,
— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2019
ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या. pic.twitter.com/HrXTkaw39L
हेही वाचा - शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्य - जयंत पाटील