ETV Bharat / state

वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण, संजय राऊत यांना करावी लागणार कोरोनाची चाचणी - sanjay raut

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांंना कोरोनाची लक्षणे दिसत होती. अखेर चाचणी केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

संजय राऊत,   वर्षा राऊत,   वर्षा राऊत कोरोना ,  संजय राऊतांच्या पत्नीला कोरोना ,  sanjay raut ,  varsha raut corona
राऊत
author img

By

Published : Apr 3, 2021, 1:34 PM IST

Updated : Apr 3, 2021, 7:40 PM IST

मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांच्या आई रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता शिवसेनेच्या आणखी एका बड्या नेत्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांंना कोरोनाची लक्षणे दिसत होती. अखेर चाचणी केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने आता संजय राऊत यांनाही कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.

दोन दिवसांपासून कोरोना लक्षणे -

गेल्या दोन दिवसांपासून वर्षा राऊत यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यांना ताप, सर्दी खोकला ही लक्षणे होती. कोरोनाची लक्षणे असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. ही चाचणी सकारात्मक आली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी फोर्टीस रुग्णालयात दाखल केले आहे. संजय राऊत यांना मात्र अजून कोणतीही लक्षणे जाणवत नाहीए. मात्र, पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर राऊत यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

राऊत - पवार भेट -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल संजय राऊत यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. मात्र आता पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर राऊत यांचा कोरोना अहवाल काय येतो, हे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा -चिंताजनक! शुक्रवारी राज्यात 47,827 नवे कोरोना रुग्ण

Last Updated : Apr 3, 2021, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.