ETV Bharat / state

Sanjay Raut On Sharad Pawar : निवड समितीचा निर्णय अपेक्षित होता, शरद पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही - संजय राऊत - Sanjay Raut On Sharad Pawar Resignation

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभराच्या राजकारणात विविध चर्चांना सुरुवात झाली. कार्यकर्त्यांना शरद पवार यांनी उद्यापासून तुम्हाला आंदोलन करावा लागणार नाही असा आश्वासन दिले होते. या सर्व घडामोडीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, या गोष्टी होणारच होत्या असं राऊत यांनी म्हटलं आहे. ते दैनिक सामना कार्यालयात माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut On Sharad Pawar Resignation
संजय राऊत
author img

By

Published : May 5, 2023, 3:49 PM IST

मुंबई: आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय कार्य करण्याची बैठक झाली आणि या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. आता सध्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले असून पुढील चर्चा सुरू आहेत.
शरद पवारांच्या राजीनामामुळे राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आंदोलन आणि उपोषणाला बसले होते.

विरोधकांच्या एकजुटीवर परिणाम होऊ शकतो: यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने शरद पवार यांचा राजीनामा भेटायला हे अपेक्षित होते. मुळात ती त्यांच्या पक्षाची अंतर्गत व्यवस्था आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला असेल किंवा त्यांनीच या अध्यक्षपदावर सध्या तरी राहावं असं त्यांचा निर्णय असेल तर तो योग्य आहे असा मला वाटतं. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय असला, या त्यांच्या पक्षांतर्गत घडामोडी जरी असल्या तरी त्याचा विरोधी पक्षाच्या एकजुटीवर परिणाम होऊ शकतो. हा परिणाम राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्रात देखील होऊ शकतो."

आमचं सर्वांचं लक्ष आहे आणि राहील: पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "या राजीनाम्याचा विरोधी पक्षाच्या एकजुटी वर परिणाम होऊ शकतो असा अंदाज असल्याने आम्ही शिवसेना उध्दव ठाकरे, काँग्रेस असेल एकूणच आमची महाविकास आघाडी असेल राष्ट्रीय स्तरावर बघितलं तर अनेक नेते आहेत ममता बॅनर्जी असतील इतर विरोधी पक्षाचे नेते असतील यांचं या सगळ्या घडामोडी कडे लक्ष आहे आणि राहील. आजच्या घडीला खास करून सध्याच्या राजकारणात देश पातळीवर ज्या काही विरोधी पक्षाच्या घडामोडी आहेत जी काही महाआघाडी सुरू आहे यात ते महत्त्वाचं नाव आहे. अशा वेळेला त्यांनी मुख्य प्रवाहात असायला हवं ही सर्वांची भूमिका आहे. ममता बॅनर्जी, राहुल गांधी, KCR या सर्वांनी त्यांना विनंती केली आहे. तुमचं नेतृत्व पुढे देखील राहायला हवं म्हणून. त्यानुसार हा निर्णय झाला. त्यामुळे सर्व त्याचं स्वागतच करतील."

बाळासाहेबांनीही राजीनामा देण्याचे सांगितले होते: इतिहासात देखील अशीच एक घटना घडली होती. ती म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर त्यांच्याच पक्षातील काही नेते नाराज होते. अशावेळी पक्षांतर्गत बंडखोरी थांबवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आपला राजीनामा जाहीर केला होता. मात्र, महाराष्ट्रभरातून शिवसैनिक मुंबईत आले आणि त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना विनवणी केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या कर्यकरणीची बैठक झाली व बाळासाहेब ठाकरे पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख पदावर कार्यरत झाले.

हेही वाचा: Sharad Pawar Resign: शरद पवारांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला-प्रफुल पटेल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.