मुंबई - जोपर्यंत लिखित स्वरूपात कोणतं प्रस्ताव भाजपकडून येत नाही तोपर्यंत शिवसेनेची भूमिका आमच्याकडून स्पष्ट होणार नाही. प्रत्येक जण आप आपला नेता निवडत आहे. भाजप देवेंद्र फडणवीस तर राष्ट्रवादीने अजित पवार यांना निवडले. स्थिर सरकार होण्यासाठी जे ठरले आहे ते तसच व्हायला हवं त्यात मुख्यमंत्री पदही हवे. उद्या शिवसेनेची बैठक होणार आहे, त्यात मग आम्ही नेता आमचा ठरवू. भाजपचा कोणता फॉर्म्युला आहे, आम्ही काही नोंद वही घेऊन बसलो नाही, असे शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्राची कुंडली शिवसेना ठरवणार
आम्ही सोबत राहण्यात महाराष्ट्राचा हित आहे. महाराष्ट्राची कुंडली आम्ही शिवसेना ठरवणार, कुठे कोणते ग्रह ठेवायचे हे आमच्या हातात आहे. मुख्यमंत्री जर अस म्हणत असतील की, शिवसेनेचे 23 आमदार संपर्कात आहेत. तर तुम्ही फक्त आकडे बांधा असा टोला देखील त्यांनी लगावला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे जे आदेश देतील ते आम्ही सर्व करू असे देखील ते म्हणाले. शिवसेनेचा कुठलाही आमदार फुटणार नाही. सगळे ठरल्याप्रमाणे होऊ द्या, अस मला म्हणायचे आहे.