ETV Bharat / state

Sanjay Raut News : 'त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही'-राज ठाकरेंना खासदार संजय राऊत यांचा टोला - संजय राऊत यांची राज ठाकरेंवर टीका

गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजपसह शिवसेनेला टोले लगावले आहेत. यात त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन घरात बसावे लागले, अशी टीका देखील केली. राज ठाकरे यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

MP Sanjay Raut
खासदार संजय राऊत
author img

By

Published : Mar 10, 2023, 11:55 AM IST

मुंबई : राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, कुणी कुणाच्या वाट्याला गेले नाही. त्यांच्या वाटेला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद का गेले? हे अख्या जगाला माहित आहे. त्यांना जर माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाची अजून व्यवस्थित वाढ होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आले, आणि जोडीला खोके होते. यामुळेच महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार गेले, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

त्यांना ईडीचा चांगलाच अनुभव : पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातले सरकार पाडण्यामध्ये ईडी, सीबीआय यांच्यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या दबावामुळेच महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पडले. ईडी काय आहे? हे मनसे प्रमुखांना वेगळे सांगण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. त्याचा चांगलाच अनुभव त्यांनी घेतलेला आहे. आमच्यासारख्या लोकांनी देखील ईडीचा अनुभव घेतला. मात्र, आमच्या तोफा थंडावल्या नाहीत. आमच्या पक्षाचे काम सुरूच राहिले आणि आजही सुरू आहे. असा सणसणीत टोला खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

नेमके काय म्हणाले होते राज ठाकरे? जे स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ते कुठे होते? काय करत होते? तर चिंतन करत होते. म्हणून सांगतो आमच्या वाट्याला कोणी जायचे नाही. मशिदींवरील अनधिकृत भोंग्याविरोधात ज्यावेळी आम्ही आंदोलन उभे केले. त्यावेळी जवळपास 17000 महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मी बोललो ना, आमच्या वाटेला जायचे नाही. त्यांना मुख्यमंत्री पदावरून जावे लागले, असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता.

हेही वाचा : Budget 2023: आश्वासने देणारे देशद्रोही आहेत,आदित्य ठाकरेंनी अर्थसंकल्पावरून शिंदे सरकारवर केली टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.