मुंबई : मणिपूर जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मणिपूर प्रकरणी पंतप्रधानांनी बैठक घ्यायला हवी होती, मात्र गृहमंत्री अमित शाहांनी बैठक बोलावली आहे. मणिपूरमध्ये शंभराच्या वर मृत्यू झालेले आहेत. पोलिसांवरती हल्ले झाले असून तिथे आमदारांची घरे जाळली गेली. त्यामुळे अमित शाहांनी मणिपूरमध्ये सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.
-
#WATCH | "Uddhav Thackeray has said in the meeting that, if there won't be a power change in 2024, then this will be the last election, so to protect democracy, we (opposition parties) have to stay united & fight the election...": Uddhav Thackeray faction MP Sanjay Raut on the… pic.twitter.com/1THVTQCDdC
— ANI (@ANI) June 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | "Uddhav Thackeray has said in the meeting that, if there won't be a power change in 2024, then this will be the last election, so to protect democracy, we (opposition parties) have to stay united & fight the election...": Uddhav Thackeray faction MP Sanjay Raut on the… pic.twitter.com/1THVTQCDdC
— ANI (@ANI) June 24, 2023#WATCH | "Uddhav Thackeray has said in the meeting that, if there won't be a power change in 2024, then this will be the last election, so to protect democracy, we (opposition parties) have to stay united & fight the election...": Uddhav Thackeray faction MP Sanjay Raut on the… pic.twitter.com/1THVTQCDdC
— ANI (@ANI) June 24, 2023
हिंसाचार सरकारच्या नियंत्रणात राहिलेला नाही : अमित शहा गृहमंत्री आणि पोलादी पुरुष असताना देखील ते मणिपूर हिंसाचार थांबवू शकले नाहीत. मणिपूर संदर्भात गृहमंत्री अमित शाहा यांनी दिल्लीला बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी उपस्थित राहतील. पुढली बैठक तात्काळ मणिपूरला घ्यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. तिकडली जनता तिकडल्या संघटना, राजकीय पक्ष यांनी उग्र आंदोलन सुरू केले. त्या सगळ्यांशी सर्वपक्षीय चर्चा करता येईल, त्यांची मते समजून घेता येईल, अशा प्रकारची बैठक गृह मंत्रालयाने मणिपूरला तात्काळ घ्यावी अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडाच्या वाफा दवडू नये : विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना महबुबा मुफ्ती यांच्या बाजुला बसण्यास जागा देण्यात आली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. त्यावर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
केक भरवायला गेलो नाही : कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग असून त्याच त्याच महबूबा मुक्ती यांच्याबरोबर आपण अडीच वर्ष सरकार बनवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या सरकारमध्ये आपण होतात, त्यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. तेव्हा सडकून टीका करताना जपून टीका करत जा, असा सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. आम्ही नवाज शरीफ यांचा केक कापायला गेलो नाही किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील झालो नाही. भविष्यात त्याच्यावर आम्ही चर्चा करू. आज उद्धव ठाकरे त्याच्यावर बोलतील, त्यामुळे उगाचच तोंडाच्या वाफा दवडू नका, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. हे तुमचेच पाप असून आगामी निवडणुकीत आम्ही एकत्र निवडणूक लढू असेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा -