ETV Bharat / state

कलम ३७० : आजचा निर्णय छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार - खासदार संभाजीराजे - कलम ३७०

जम्मू काश्मीरला लागू  असलेल्या ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडला आहे. हा देशाला एकत्र करणारा निर्णय असून, छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार!!!असे ट्वीट करुन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

खासदार संभाजीराजे
author img

By

Published : Aug 5, 2019, 3:27 PM IST

मुंबई - जम्मू काश्मीरला लागू असलेले ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव आज राज्यसभेत सादर करण्यात आला आहे. हा देशाला एकत्र करणारा निर्णय असून, छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार!!! असे ट्वीट करुन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. हा प्रस्ताव सभागृहात मांडताच विरोधकांनी मोठा गदारोळ घातला. जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले असून, जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत.

  • देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार!!! #Article370 #KashmirHamaraHai

    — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या निर्णयाचे संभाजीराजेंनी स्वागत केले आहे. प्रत्येक भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने काश्मीर भारताचे अविभाज्य अंग बनले आहे. या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार मलाही होता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. काश्मिरी जनतेला मुख्यप्रवाहात आणणऱ्या निर्णयासोबत आपण सर्वजण उभे राहिले पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एक होणं आवश्यक असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे. हा निर्णय छत्रपती शिवरायांनाही आवडला असणार असे संभाजीराजें म्हणाले. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरुन नागरिकांमधून संमीश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काही जणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.