ETV Bharat / state

MIM Tiranga Rally : मी खासदार आहे की दहशतवादी; एमआयएचे इम्तियाज जलील यांचा सवाल - इम्तियाज जलील एमआयएम तिरंगा रॅली मुंबई

नवी मुंबईजवळ तिरंगा रॅली पोहचल्यावर पोलिसांनी दिलेली वागणूक चुकीची होती. मी खासदार आहे का दहशतवादी? असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. तसेच पोलिसांनी मुंबईला जाण्यासाठी गाड्यांवरील तिरंगा झेंडा काढण्यास सांगितल्याचा आरोप जलील यांनी केला. ( MP Imtiyaz Jaleel in Tiranga Rally Mumbai ) एआयएमआयएम पक्षाच्या वतीने शनिवारी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. ( MIM Tiranga Rally )

MP Imtiyaz Jaleel
एमआयएचे खासदार इम्तियाज जलील
author img

By

Published : Dec 11, 2021, 10:36 PM IST

मुंबई - एआयएमआयएम पक्षाच्या वतीने शनिवारी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मोठ्या विरोधानंतरही आज चांदीवली येथे सभा रॅली पार पडली. ( MIM Tiranga Rally ) यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. नवी मुंबईजवळ तिरंगा रॅली पोहचल्यावर पोलिसांनी दिलेली वागणूक चुकीची होती. मी खासदार आहे का दहशतवादी? असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. तसेच पोलिसांनी मुंबईला जाण्यासाठी गाड्यांवरील तिरंगा झेंडा काढण्यास सांगितल्याचा आरोप जलील यांनी केला. ( MP Imtiyaz Jaleel in Tiranga Rally Mumbai )

तिरंगा रॅली वाशीजवळ पोहोचल्यानंतर या रॅलीमध्ये आम्ही तिरंगा झेंड्याचा वापर केला होता. आम्ही कोणत्याही पक्षाचा झेंडा लावून आलो नव्हतो.आम्ही हिरवा, निळा, भगवा, पिवळा झेंडा लावला नव्हता. आम्ही या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा गाडीला लावून ही तिरंगा रॅली मुंबईला घेऊन आलो. या तिरंग्यावर आम्हाला अभिमान आहे. तिथे इतका पोलीस फौजफाटा होता की मला शंका आली मी खासदार आहे की कोणी दहशतवादी आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - MIM Tiranga Rally LIVE Updates : एमआयएमची तिरंगा रॅली मुंबईत; सभा सुरू

जलील यांचा पोलिसांवर आरोप -

ते म्हणाले, वाशीजवळ काही पोलिसांनी आम्हाला गाड्यांचे तिरंगा ध्वज काढण्यास सांगितले, तरच पुढे जाऊ देऊ, असा आदेश देण्यात आला. हे आदेश वाशीच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिले. त्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी देखील तेथे उपस्थित होते. त्यांच्यासमोर मुंबईला जायचं असेल तर गाडीचा तिरंगा काढा असं सांगण्यात आलं, असा आरोप जलील यांनी पोलिसांवर केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.