ETV Bharat / state

वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला अटक - Mira Bhayander crime news

मीरा रोड मधील शांती नगर परिसरात रेजूवनी स्पा वर नयानगर पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. सदर स्पा मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Naya Nagar Police Station
नया नगर पोलीस स्टेशन
author img

By

Published : Oct 22, 2020, 7:17 AM IST

मीरा भाईंदर- मीरा रोड मधील शांती नगर परिसरात रेजूवनी स्पा वर नया नगर पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. सदर स्पा'मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला आणि दोन आरोपीना अटक केली आहे.

मीरा भाईंदर शहरात अनैतिक धंदे सुरू आहेत. त्यावर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी पदभार स्वीकारल्या पासून चरस, गांजा, विक्रेत्यांवर चांगली कारवाई होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मीरा रोड, नवघर पोलिसांनी स्पा पार्लरवर छापा टाकुन कारवाई केली. तर नया नगर पोलिसांना मीरा रोड पूर्वेला शांती नगर परिसरात रेजूवनी स्पा पार्लर मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून खात्री पटल्यानंतर छापा टाकला यामध्ये दोन आरोपीना अटक केली आहे. दोन आरोपीना अटक करून एका पीडितेची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.