ETV Bharat / state

'आई आणि डॉक्टर दोन्ही जबाबदारी सांभाळणे तारेवरची कसरत' - मातृत्व आणि कर्तव्याला मानाचा मुजरा

संपूर्ण जगाला कोरोनानं हैराण केलंय. आपला महाराष्ट्र देखील याला अपवाद नाही. महाराष्ट्रात रोज सरासरी 55 हजार रुग्ण कोरोनाबाधित होत आहे. डॉक्टर आपली जबाबदारी चोख बजावत आहेत. रुग्णालयात डॉक्टर रुग्णांना बरं करण्यासाठी झटत आहेत. मात्र घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत दुहेरी जबाबदारी पार पाडत आहेत. अशाच एका डॉक्टर आईची आपण कहाणी जाणून घेणार आहोत

कोरोना काळ हा कठीण काळ
कोरोना काळ हा कठीण काळ
author img

By

Published : May 9, 2021, 10:01 AM IST

मुंबई - संपूर्ण जगाला कोरोनानं हैराण केलंय. आपला महाराष्ट्र देखील याला अपवाद नाही. महाराष्ट्रात रोज सरासरी 55 हजार रुग्ण कोरोनाबाधित होत आहे. डॉक्टर आपली जबाबदारी चोख बजावत आहेत. रुग्णालयात डॉक्टर रुग्णांना बरं करण्यासाठी झटत आहेत. मात्र घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत दुहेरी जबाबदारी पार पाडत आहेत. अशाच एका डॉक्टर आईची आपण कहाणी जाणून घेणार आहोत.

मातृत्व आणि कर्तव्याला मानाचा मुजरा
डॉ. शितल धनावडे मागच्या 17 वर्षांपासून रुग्णांची सेवा करत आहेत. या 17 वर्षाच्या काळामध्ये सर्वात आव्हानात्मक काळ जर कोणता असेल तर तो या वर्षभरातील कोविडचा काळ असल्याचे त्या सांगतात. कोविड काळात रुग्णांची सेवा तर करायची आहेच मात्र घरी गेल्यानंतर कुटुंबाला देखील सांभाळायचं आहे. अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागतेय. कोरोनाची पहिली लाट आणि कोरोनाची दुसरी लाट अशा दोन्ही लाटेत त्यांनी रुग्णांची सेवा केली. मात्र डॉक्टरी पेशाच्या आईनं आपलं कुटुंब देखील सांभाळलं.. डॉक्टर. शितल धनावडे सध्या सांगली येथे वैद्यकिय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. घरी तीन लहान मुलं आहेत . छोटा मुलगा अवघा दोन वर्षांचा आहे. डॉ. शितल सांगतात. आम्ही रुग्णालयात आपली सेवा 100 टक्के बजावत होतो. मात्र, जेव्हा घरी जात होतो तेव्हा आपल्या कुटुंबापर्यंत कोरोनाची साथ पोहोचू न देणं हे फार आव्हानात्मक होतं. रुग्णालयात पीपीई कीट किंवा मास्क सारख्या सुविधा होत्या. मात्र घरच्या वातावरणात आल्यानंतर कुटुंबासमवेत रहावं लागत त्यावेळी काळजी देखील घेतली जाते. लॉकडाउनच्या काळात शाळा बंद होत्या. मुलं घरात होती. आम्ही रुग्णालयात रुग्णांची सेवा करत होतो. अशा काळात मुलांचा मानसिक स्वास्थ सांभाळणं महत्त्वाचं होतं. इतर मुलांचे पालक त्यावेळेस घरी असायचे. घरी आल्यानंतर मुलं आज काय वेगळा पदार्थ खाऊ घालणार का अशी विचारणा करायचे. लहान मुलाला बोलता येत नव्हतं. घरी आल्यानंतर त्याच्यापासून दूर राहून त्याला न्याहाळण हे खूप आव्हानात्मक होतं. त्याला बोलता येत नव्हतं मात्र त्याचा स्पर्श हीच त्याची भाषा होती. लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी एक मावशी देखी ठेवल्या होत्या. कोविडचा काळ भयंकर असल्याने मावशी घरी येऊ शकत नव्हत्या अशा वेळेस माझ्या दोन्हीही मोठ्या मुलांनी लहान भावाचा सांभाळ केला. असं शितल धनावडे सांगतात.मातृत्व आणि कर्तव्य या दोन्हींची सांगड बांधत असताना शितल धनावडे यांनी आपल्या दोन्ही कर्तव्य मध्ये कुठेही कमी येऊ दिली नाही. डॉ. शितल धनावडे यांच्या कार्याला मानाचा मुजरा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.