ETV Bharat / state

चाईल्ड पोर्नोग्राफीची सर्वाधिक प्रकरणे मुंबईत - मुंबई चाईल्ड पोर्नोग्राफी गुन्हे

राज्यात लहान मुलांच्या संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत सायबर पोलिसांकडून 'ऑपरेशन ब्लॅक फेस' नावाची मोहीम हाती घेण्यात आलेली होती.

child
चाईल्ड
author img

By

Published : Oct 14, 2020, 12:57 PM IST

मुंबई - राज्यात चाईल्ड पोनोग्राफीचे गुन्हे वाढत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभरात 151 गुन्हे दाखल केले असून 48 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या दरम्‍यान महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून 'ऑपरेशन ब्लॅक फेस' नावाची मोहीम हाती घेण्यात आलेली होती. त्या अंतर्गत राज्यात वाढत असलेल्या चाईल्ड पोनोग्राफीच्या संदर्भात या कारवाया करण्यात आल्या.

'ऑपरेशन ब्लॅक फेस' मोहिमेत मुंबईत चाईल्ड पोर्नोग्राफीची प्रकरणे समोर आली आहेत

राज्यभरात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये मुंबई, बीड, परभणी, नंदुरबार, चंद्रपूर , भंडारा या ठिकाणी चाईल्ड पोनोग्राफी संदर्भातील गुन्हे दाखल करण्यात आले. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने महाराष्ट्रातील 1 हजार 700 प्रकरण महाराष्ट्र सायबर विभागाकडे या अगोदर पाठवली होती. यातील सर्वाधिक 600 प्रकरणे ही देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरातील असल्याचे समोर आले होते. त्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने यासंदर्भात कारवाई करण्यास सुरुवात केली.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या गेल्या तीन वर्षाच्या अहवालानुसार 2017मध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार होण्याच्या 16 हजार 918 घटना घडल्या. 2018 मध्ये हे प्रमाण वाढून 18 हजार 892 इतके झाले. 2019 मध्येही हे प्रमाण आणखी वाढले आहे. 2019 मध्ये अल्पवयीन मुलांवर अत्याचार होण्याच्या 19 हजार 592 घटना घडल्या असून यासंदर्भात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

मुंबई शहरात अल्पवयीन मुलांच्या संदर्भात 2017 मध्ये 3 हजार 790 गुन्हे घडले तर 2018 मध्ये 3 हजार 511 गुन्हे घडले. 2019 मध्ये 3 हजार 640 गुन्हे अल्पवयीन मुलांच्या संदर्भात घडले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.