ETV Bharat / state

आज...आत्ता...सकाळी ९ पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर

मुंबई महापालिकेच्या 'ए' विभागाच्या हलगर्जीपणामुळेच सीएसएमटी पूल दुर्घटना घडली असल्याचा ठपका अंतिम अहवालात ठेवण्यात आला आहे, तर गोव्यात आमदारांना एकत्रीत ठेवणे मुख्यमंत्र्यांची कसोटी असल्याचे गडकरी म्हणाले. पुणे-नगर महामार्गावर टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन २ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच उस्मानाबादेतील मुळेगाव येथील गाकऱ्यांवर दुषीत पाणी पिण्याची वेळ आली आहे. शिवाय आज सातव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

author img

By

Published : May 17, 2019, 9:00 AM IST

महत्त्वाच्या घडामोडी

"ए" विभागाच्या हलगर्जीपणामुळे सीएसएमटी पूल दुर्घटना - अंतिम अहवालात ठपका
मुंबई - सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेचा अंतिम अहवाल आज महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना सादर करण्यात आला. या अहवालात हा पूल पालिकेच्या "ए" विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि पालिका अभियंत्याच्या दुर्लक्षामुळे कोसळून दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला होता. वाचा सविस्तर

गोव्यात आमदारांना एकत्र ठेवणे ही मुख्यमंत्र्यांची कसोटी - नितीन गडकरी
पणजी - गोव्यातील आमदार बागेत फिरल्यासारखे फिरतात, अशा आमदारांना एकत्रीत ठेवून सरकार टिकवणे कठीण आहे. अमेरिकेत लग्न टीकत नाहीत आणि गोव्यात आमदारांचा पक्ष टीकत नाही. अशा स्थितीत सरकार आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भाजप उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पणजीत केले. भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. वाचा सविस्तर

पुणे-नगर महामार्गावर टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात ; २ जणांचा जागीच मृत्यू
पुणे-नगर महामार्गावरील पेरणेफाटा येथे टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. विशाल तकाजी ताजने (२६) आणि राजू गुजरे (२५) अशी त्या मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. वाचा सविस्तर

पाणी पिण्याचे की नाल्याचे? मुळेवाडी ग्रामस्थांवर दुषीत पाणी पिण्याची वेळ
उस्मानाबाद - शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळेवाडी या गावातील लोक सध्या भीषण समस्येला तोंड देत आहेत. शुद्ध पाण्याअभावी ग्रामस्थांवर आज काळेकुट्ट आणि गढूळ पाणी वापरण्याची वेळ आली आहे. परिणामी २० टक्के ग्रामस्थांना त्वचेचे आजार जडले आहेत. वाचा सविस्तर

लोकसभा निवडणूक 2019 : आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, ८ राज्यात रविवारी मतदान
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने प्रचारावर एक दिवस आधी म्हणजेच १६ मे रोजी बंदी घातली. त्यामुळे पश्चिम बंगाल सोडून ८ राज्यांमध्ये १७ मे रोजी संध्याकाळपर्यंतच प्रचार सुरू राहील. वाचा सविस्तर

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.