ड्रेनेजची सफाई करताना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू
ठाणे - ड्रेनेजची साफसफाई करताना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. शहरातील ढोकली नाका परिसरातील सप्तश्री हाईटसमोर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दल आणि पोलिसांच्या मदतीने या सर्वांना बाहेर काढण्यात आले आहेत. वाचा सविस्तर...
चकमक ; जम्मू काश्मीरात भारतीय जवानांनी दहशतवाद्याला घातले कंठस्नान
श्रीनगर - शोपीयानमध्ये भारतीय जवानासोबत दहशतवाद्यांची चकमक उडाली. या चकमकीत भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
सहाव्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, ५९ जागांवर रविवारी होणार मतदान
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी रविवारी (१२ मे) मतदान होत आहे. या टप्प्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सहाव्या टप्प्यात ५९ जागांवर मतदान होत असून, यामध्ये ४४ जागा भाजपकडे आहेत. या जागा कायम राखण्याचे आव्हान भाजपपूढे असणार आहे. वाचा सविस्तर...
काँग्रेसची आज बैठक; राधाकृष्ण विखे पाटलांचा होणार 'फैसला' ?
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर काँग्रेसची आज मुंबईतील टिळकभवन येथे बैठक होत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेल्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांवरील कारवाईचा मुद्दा चर्चिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात मुंबईसह राज्यातील सर्व मतदार संघात झालेल्या मतदानाचा आणि कामकाजाचाही आढावा घेतला जाणार असून दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याची रणनीतीही ठरवली जाणार आहे. वाचा सविस्तर...
घड्याळाचे बटन दाबले तरी मत कमळालाच, मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय - शरद पवार
सातारा - सातारा ईव्हीएम मशीनमध्ये घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत मिळते, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे मला या प्रक्रियेची काळजी वाटते. त्यामुळे ही प्रक्रिया किचकट आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. आज सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाचा सविस्तर...
बातमी, सर्वांच्या आधी..
https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra