ETV Bharat / state

आज...आत्ता... शनिवारी सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - ETV Bharat

आज दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. तसेच नाशिकमध्ये ४० नागरिकांना उलटी व जुलाबाचा त्रास झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोल्हापुरातील आमदार क्षीरसागर यांच्या अंगरक्षकाच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. विधानसभा मतदारसंघातील लोकसंख्या बघून वंचित घटकांना संधी देण्याचा आग्रह काँग्रेसच्या आढावा बैठकीत धरण्यात आला, तर हिंगोलीत मृतदेहाची पोलीस ठाण्यात विटंबना केल्याने नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Jun 8, 2019, 8:44 AM IST

दहावीचा निकाल दुपारी १ वाजता होणार जाहीर; 'या' संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

मुंबई - महाराष्ट्र माध्यमिक बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावीचा निकाल ऑनलाईन पाहाता येणार आहे. तसेच निकालाची प्रतही संकेतस्थळावरून मिळवता येणार आहे. वाचा सविस्तर...

नाशिकमध्ये ४० नागरिकांना उलटी व जुलाबचा त्रास, पाणी किंवा अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज

नाशिक - नांदगाव तालुक्यातील वसंतनगर येथे ४० नागरिकांना अचानक उलटी व जुलाबचा त्रास होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पाण्यातून किंवा अन्नातून विषबाधा झाली असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर...

आमदार क्षीरसागर यांच्या अंगरक्षकाच्या घरी चोरी; पिस्तुलासह ३० जिवंत काडतुसे लंपास

कोल्हापूर - उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अंगरक्षकाची पिस्तूल चोरी झाल्याची घटना घडली आहे. क्षीरसागर यांच्या राहत्या घरी चोरी झाली असून चोरट्याने पिस्तूलसह ३० जिवंत काडतुसे, सोने आणि रोकड लंपास केली आहे. गुरूवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला असून यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर...

विधानसभा मतदारसंघानुसार वंचित घटकांना संधी द्या, नेत्यांचा आग्रह

मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीसोबत काँग्रेस पक्ष जुळवून घेईल. मात्र, त्यांच्यासोबत आघाडी न झाल्यास पर्याय म्हणून मतदारसंघातील लोकसंख्या बघता त्या ठिकाणच्या वंचित घटकांना संधी देण्याचा आग्रह, काँग्रेस नेत्यांनी धरला आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराजयानंतर विधानसभेची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील विधानसभानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. वाचा सविस्तर...

मृतदेहाची पोलीस ठाण्यात विटंबना करणे नातेवाईकांना भोवले, गुन्हा दाखल

हिंगोली - जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे रस्त्यावरून गेला म्हणून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी मृत महिलेच्या मुलांनी मृतदेह स्मशानभूमीत न नेता थेट पोलीस ठाण्यात नेला. त्यानंतर सुमारे साडे तीन तास मृतदेह तसाच ठेवून विटंबना केली. त्यामुळे मृताची दोन मुले आणि तिचा साडू यांच्यासह इतर १० ते १२ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी
https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.