बोईसर-चिल्हार रोडवरील गुंदले गावाजवळील फर्निचर गोदामाला भीषण आग
पालघर - बोईसर - चिल्हार रोडवरील गुंदले गावाजवळील सेकंड हँड फर्निचर गोदामाला भीषण आग लागली आहे. यानंतर या आगीची झळ येथील 17 गाळ्यांना बसली आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. वाचा सविस्तर...
हिंदुत्त्ववादी शक्तींच्या हातात संपूर्ण व्यवस्था, पुनाळेकर त्याचेच उदाहरण - अॅड. सदावर्ते
मुंबई - आमच्या व्यवसायावर नामुष्की ओढवली आहे. हिंदुत्त्ववादी शक्तींनी संपूर्ण व्यवस्था हातात घेतली आहे. पुनाळकर त्याचेच उदाहरण आहे, असा आरोप प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला. वाचा सविस्तर...
वंचित आघाडीचा लाभ केवळ एमआयएमने घेतला - नीलम गोऱ्हे
मुंबई - एकीकडे वंचित बहुजन आघाडीच्या मताधिक्क्याने ९ ते १० काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राज्यात वंचित आघाडीचा दबदबा निर्माण झाला आहे. या बहुजन आघाडीचा वंचित घटकाला फायदा झाला नसून केवळ एमआयएमलाच या निवडणुकीत लाभ झाला असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर...
मद्यधुंद एपीआयने दुचाकीला उडवले; तिघे जखमी
लातूर - लग्नाहून गावाकडे परतणाऱ्या दुचाकीस्वाराला मद्यधुंदीत असलेल्या पोलिसाने आपल्या स्विफ्ट कारने उडवल्याने दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चाकूर तालुक्यातील घरणीजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. यातील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा सविस्तर...
ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या उपस्थितीत रंगला ५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा
मुंबई - मुंबईतील वरळी येथील 'नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया' येथे ५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने काल (२६ मे) पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली पहिल्यांदाच भारतात आले होते. त्यांच्यासोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उज्ज्वल निरगुडकर, संकलक कॅरॉल लिटलटन, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. वाचा सविस्तर...
बातमी, सर्वात आधी...
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra