रोजगार निर्मिती - गुंतवणुकीबाबत पंतप्रधान मोदी गंभीर; स्वत:च्या अध्यक्षतेखाली स्थापन केल्या दोन विशेष समित्या
नवी दिल्ली - देशात गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी मोदी सरकारने मंत्रीमंडळाच्या दोन समित्या स्थापन केल्या आहेत. गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती तथा कौशल्य विकास वृद्धी करण्यासाठी स्थापन करण्यासाठी आलेल्या या समित्यांचे अध्यक्षपद पंतप्रधानांकडे असणार आहे. वाचा सविस्तर...
शिवसेना पक्षप्रमुखांसह नवनिर्वाचित खासदार जाणार अयोध्येला
मुंबई - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर शिवसेनेचे सर्व खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह १५ जूनला अयोध्येला जाणार आहेत. तेथे जाऊन सर्वजण रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौर्यावर जात आहेत. यावेळी ते करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाल्यानंतर ठाकरे यांनी नुकतेच एकवीरा देवीचे दर्शन घेतले. वाचा सविस्तर...
बारामती पाणीप्रश्न : सरकारची नियमानुसारच कार्यवाही, गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण
जळगाव - बारामतीचे पाणी दुसरीकडे वळवण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या मुद्द्यावरून पश्चिम महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापले आहे. पाणीप्रश्नावरुन राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. त्यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आरोपाचे खंडन करत सरकार नियमानुसारच कार्यवाही करत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.वाचा सविस्तर...
लातुरात कचरा डेपोला आग, आगीवर नियत्रंण मिळवण्याचे काम सुरू
लातूर - शहरातील आंबेडकर पार्कच्या बाजूला असलेल्या कचरा बुधवारी रात्री अचानक आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, वारंवार होणाऱ्या अशा घटनामुळे संशय व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर...
पुरुषप्रधान संस्कृतीविरोधात महिला पोलीस अधिकाऱ्याने दिलेला लढा - बंदीशाळा
मुंबई - स्त्री समाजात कोणत्याही क्षेत्रात वावरली तरीही पुरुषप्रधान संस्कृतीत ती एकटीच असते. अशा आशयाभोवती फिरणाऱ्या एका सत्य घटनेवर आधारित 'बंदीशाळा' हा सिनेमा येत्या २१ जूनला प्रदर्शित होतोय. या सिनेमात अभिनेत्री मुक्ता बर्वे ही माधवी सावंत या एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग पोलीस अधीक्षकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. वाचा सविस्तर...
बातमी, सर्वांच्या आधी
https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra