ETV Bharat / state

आज...आत्ता... सकाळी 9 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

१६ वी लोकसभा बरखास्त, नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींकडे सोपवला राजीनामा. धक्कादायक; घराचा पाया खोदताना सापडला बेपत्ता व्यक्तीच्या हाडांचा सांगाडा, सेलू शहरात खळबळ. पाणी समजून डिझेल पिल्याने चिमुकल्याचा मृत्यू; पुण्यातील घटना. राज ठाकरेंवर टीका करणारे पोस्टर काढा; अन्यथा बघून घेऊ, मनसे कार्यकर्त्यांकडून प्रसाद लाड यांना धमकी. मोदींना कितीही बहुमत मिळाले तरी ते ३७० कलम हटवू शकत नाहीत - फारुक अब्दुल्ला

आज...आत्ता... सकाळी 9 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...
author img

By

Published : May 25, 2019, 9:54 AM IST

१६ वी लोकसभा बरखास्त, नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींकडे सोपवला राजीनामा

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रीमंडळाने १६ वी लोकसभा बरखास्त केली आहे. आज केंद्रीय मंत्रीमंडळीची बैठक झाली, यामध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा राजीनामा सोपवला आहे. वाचा सविस्तर

धक्कादायक; घराचा पाया खोदताना सापडला बेपत्ता व्यक्तीच्या हाडांचा सांगाडा, सेलू शहरात खळबळ
परभणी - सेलू शहरातील वालूर नाक्यावर घराच्या बांधकामादरम्यान पाया खोदताना मानवी हाडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही हाडे बेपत्ता झालेल्या व्यक्तीची असल्याची माहिती रात्री उशिरा पुढे आली. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. वाचा सविस्तर

पाणी समजून डिझेल पिल्याने चिमुकल्याचा मृत्यू; पुण्यातील घटना

पुणे - पाणी समजून डिझेल पिल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील देहूगाव भागात घडली आहे. वेदांत गौतम गायकवाड, असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याच नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याने शुक्रवारी रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर

राज ठाकरेंवर टीका करणारे पोस्टर काढा; अन्यथा बघून घेऊ, मनसे कार्यकर्त्यांकडून प्रसाद लाड यांना धमकी

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर भाजपकडून मनसेच्या विरोधात 'लाव रे ते पोस्टर' म्हणणारे फ्लेक्स सायन परिसरात लावण्यात आले होते. यावर राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून हे पोस्टर तात्काळ हटविण्याची मागणी पोलिसांकडे केली गेली. मात्र, काही कार्यकर्त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. वाचा सविस्तर

मोदींना कितीही बहुमत मिळाले तरी ते ३७० कलम हटवू शकत नाहीत - फारुक अब्दुल्ला

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी कितीही बहुमताने आले आणि त्यांचे सरकार कितीही शक्तीशाली असले तरी ते कलम ३७० आणि ३५-अ हटवू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया नॅशनल काँन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी दिली आहे. संसदेत भाजपला कितीही बहुमत असले तरी त्याने काहीच फरक पडत नाही. जम्मू काश्मीरसाठीचे ३७० कलम हटवने त्यांना शक्य नसल्याचे ते म्हणाले. वाचा सविस्तर

Intro:Body:

rahul

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.