मुंबई - सोमवारी (दि. 4 जाने.) राज्यात 2 हजार 766 नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 लाख 47 हजार 11 वर पोहोचला आहे. राज्यात आज (सोमवार) 29 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 49 हजार 695 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.56 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 48 हजार 801 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आज 10 हजार 362 रुग्ण बरे होऊन घरी गेले,
अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.88 टक्के
राज्यात आज (सोमवारी) 10 हजार 362 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण 18 लाख 47 हजार 361 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.88 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 30 लाख 4 हजार 876 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 19 लाख 47 हजार 11 नमुने म्हणजेच 14.97 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 41 हजार 728 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण 48 हजार 801 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - राज्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव, ८ जणांना लागण
हेही वाचा - दिलासा..! आता 'बीडीडी'तील 2017 नंतरचे रहिवासीही होणार पात्र