ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : दिलासा..! राज्यात कोरोनामुळे आज एकही मृत्यू नाही, 225 नवे रुग्ण

राज्यात कोरोना आता नियंत्रणात येत असून सोमवारी (दि. 7 मार्च) दिवसभरात केवळ 225 रुग्ण सापडले ( Maharashtra Corona Update ) आहेत. तर दुसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण 98.8 इतके असून राज्यात सक्रिय रुग्ण 3 हजार 472 इतके आहेत. दुसरीकडे ओमायक्रॉनचा आज एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Mar 7, 2022, 7:49 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना आता नियंत्रणात येत असून सोमवारी (दि. 7 मार्च) दिवसभरात केवळ 225 रुग्ण सापडले ( Maharashtra Corona Update ) आहेत. तर दुसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण 98.8 इतके असून राज्यात सक्रिय रुग्ण 3 हजार 472 इतके ( Active Cases in Maharashtra ) आहेत. दुसरीकडे ओमायक्रॉनचा आज एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

राज्यात जानेवारी महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोकेवर काढले होते. सुरुवातीच्या काळात 40 हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली होती. मात्र, सध्या कोरोना चांगलाच नियंत्रणात आला आहे. आज 225 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकाही रुग्णाचा आज मृत्यू झालेला नाही. दुसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.8 टक्के असून दिवसभरात 461 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 77 लाख 17 हजार 823 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

कोविडच्या निदानासाठी आजपर्यंत 7 कोटी 83 लाख 14 हजार 109 चाचण्या केल्या. त्यापैकी 10.05 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 69 हजार 38 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 28 हजार 975 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 589 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 3 हजार 472 कोरोना सक्रिय रुग्ण ( Active Cases in Maharashtra ) आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रॉनचे शून्य रुग्ण - कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमयक्रॉनच्या रुग्णात मागील आठवडापासून भर पडत होती. आज एकही रुग्ण सापडलेला नाही. आजपर्यंत 5 हजार 726 रुग्ण बाधित झाले आहेत.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण

मुंबई महापालिका - 38

ठाणे - 1

ठाणे महापालिका - 9

नवी मुंबई महापालिका - 1

मीरा भाईंदर - 3

नाशिक - 13

नाशिक महापालिका - 2

अहमदनगर - 31

अहमदनगर महापालिका - 4

पुणे - 15

पुणे महापालिका - 29

पिंपरी चिंचवड महापालिका - 15

सातारा - 5

नागपूर महापालिका - 5

हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांची वेतन वाढ चुकीची, काँग्रेस विलिनीकरणावर ठाम - श्रीरंग बरगे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.