ETV Bharat / state

कोरोनामुळे शाळा बंद; मुंबईत मात्र २०६ बोगस शाळा सुरू, बंद करण्याचे महापालिकेचे आदेश

कोरोनामुळे राज्यात सर्वच शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबई तब्बल २०६ बोगस शाळा नियमबाह्य सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये इंग्रजी माध्यमातील शाळांचा समावेश जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत मात्र २०६ बोगस शाळा सुरू
मुंबईत मात्र २०६ बोगस शाळा सुरू
author img

By

Published : Dec 17, 2020, 11:10 AM IST

मुंबई - राज्य सरकार, महापालिकेचा शिक्षण विभागाची मान्यता न घेताच बेकायदेशीर शाळा सुरू असल्याचे प्रकार दरवर्षी उजेडात येतात. यंदाही असाच प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे शाळा बंद असतानाही मुंबईत २०६ शाळा बेकायदेशीररित्या सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात बहुतांश शाळा इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक १६२ बेकायदा शाळा असल्याचे उघडकीस आले आहे. या शाळा बंद करण्याची नोटीस पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांना पाठवली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पालक, विद्यार्थ्यांची फसवणूक -

आपल्या मुलांना इंग्रजी लिहिता वाचता यावे, मुलांना इंग्रजीमधून शिक्षण मिळावे यासाठी पालक आग्रही असतात. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. मात्र या शाळा अधिकृत की अनधिकृतपणे चालवल्या जात आहेत, याची माहिती पालकांना नसल्याने हजारो पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. असा प्रकार उघडकीस आल्यावर राज्य सरकार आणि पालिकेच्या शिक्षण विभागाकडून मान्यता न घेता सुरू असलेल्या बोगस शाळांची यादी घोषित करण्यास महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे.

कोरोनामुळे शाळा बंद, बेकायदेशीर शाळा सुरूच -

मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. मार्चमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण होऊ शकते. यासाठी अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यावर शाळा सुरू केल्या जातील, असे राज्य सरकार आणि महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही मुंबईत २०६ शाळा बेकायदेशीररित्या सुरू असल्याचे उघड झाले आहे.

२०६ बोगस शाळा -
मुंबई शहर आणि उपनगरातील २०६ बोगस शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून बेकायदा शाळांची यादी जाहीर करण्यात येते. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शिक्षण विभागाने २३१ बेकायदा शाळांची यादी जाहीर केली होती, तर २०१९-२० या शैक्षणिक वर्षात २११ शाळा बेकायदा जाहीर केल्या होत्या. यंदा या शाळांच्या संख्येत घट झाली आहे. यंदा २०२० - २१ या वर्षात २०६ शाळा बेकायदा म्हणून जाहीर केल्या आहेत.

इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक शाळा -
बेकायदा शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक १६२ शाळा आहेत, तर उर्दू माध्यमाच्या १६, हिंदी माध्यमाच्या १५ आणि मराठी माध्यमाच्या १३ बेकायदा शाळा आहेत. त्याचप्रमाणे, पालिकेच्या एम/पूर्व विभागामध्ये म्हणजेचे मानखुर्द, गोवंडी परिसरामध्ये सर्वाधिक ६७ बेकायदा शाळा आहेत. त्या खालोखाल पी/नॉर्थ म्हणजेच मालाड-मालवणी, पठाणवाडी या परिसरात १८ शाळा, एस वॉर्ड म्हणजे विक्रोळी-भांडुप परिसरात १५, एफ/नॉर्थ म्हणजे वडाळा, अ‍ँटॉप हिल, सायन-कोळीवाडा या भागामध्ये १४, एल म्हणजे कुर्ला भागामध्ये १२, आर/साउथ म्हणजे कांदिवलीमधील १० शाळा बेकायदा असल्याचे पालिकेकडून घोषित करण्यात आले आहे.

तातडीने शाळा बंद करा -

महापालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील बेकायदा शाळांची यादी जाहीर केली आहे. शहर आणि उपनगरांमध्ये तब्बल २०६ शाळांनी सरकार आणि महापालिकेची मान्यता न घेताच शाळा सुरू केल्या आहेत. या बेकायदा शाळा तातडीने बंद करा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेश पालिकेने शाळा प्रशासनाला दिले असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.