मुंबई - राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्याच्या तिसऱ्या दिवशी 51 हजार 240 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या 24 हजार 186 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजार असणाऱ्या 3 हजार 656 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.
राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे आज (दि. 3) 51 हजार 240 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 41 हजार 225 लाभार्थ्यांना पहिला डोस तर 10 हजार 15 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. हेल्थ वर्कर आणि फ्रन्टलाइन वर्कर यांचेही लसीकरण सुरू आहे यांपैकी आज 7 हजार 410 हेल्थ वर्कर यांना तर 5 हजार 973 फ्रन्टलाइन वर्कर यांना पहिला डोस देण्यात आला. तर 10 हजार 15 फ्रन्टलाइन वर्कर यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. राज्यात आज 50 हजार 263 लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड ही लस देण्यात आली. तर 977 लाभार्थ्यांना कोव्हक्सिनने लसीकरण करण्यात आले. राज्यात आत्तापर्यंत 13 लाख 72 हजार 886 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
आत्तापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थ्यांचे लसीकरण?
अहमदनगर - 45 हजार 401
अकोला - 16 हजार 886
अमरावती - 27 हजार 634
औरंगाबाद - 36 हजार 172
बीड - 26 हजार 495
भंडारा - 16 हजार 694
बुलडाणा - 21 हजार 760
चंद्रपूर - 27 हजार 799
धुळे - 16 हजार 830
गडचिरोली - 16 हजार 11
हिंगोली - 9 हजार 390
जळगाव - 29 हजार 723
जालना - 18 हजार 741
कोल्हापूर - 46 हजार 461
लातूर - 24 हजार 766
मुंबई - 2 लाख 45 हजार 657
नागपूर - 62 हजार 126
नांदेड - 21 हजार 10
नंदुरबार - 20 हजार 003
नाशिक - 62 हजार 42
उस्मानाबाद - 14 हजार 676
पालघर - 35 हजार 430
परभणी - 12 हजार 728
पुणे - 1 लाख 38 हजार 869
रायगड - 21 हजार 857
रत्नागिरी - 20 हजार 48
सांगली - 32 हजार 389
सातारा - 50 हजार 802
सिंधुदुर्ग - 12 हजार 136
सोलापूर - 40 हजार 02
ठाणे - 1 लाख 16 हजार 341
वर्धा - 24 हजार 196
वाशिम - 10 हजार 686
यवतमाळ - 32 हजार 269
राज्यात एकूण आतापर्यंत 13 लाख 72 हजार 886 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
हेही वाचा - 'गोकूळ'च्या निवडणुकीचा मार्ग अखेरीस मोकळा; हस्तक्षेपास न्यायालयाचा नकार