ETV Bharat / state

Special Trains : मध्य रेल्वे मार्गावर ६२६ उन्हाळी विशेष रेल्वे; प्रवाशांना मोठा दिलासा

author img

By

Published : May 19, 2022, 5:24 PM IST

उन्हाळ्याच्या सुट्या साजऱ्या करण्यासाठी आणि लग्न सराईचा सीजन असल्यामुळे बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने रेल्वेकडून गर्दीचे विभाजन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून दर वर्षी उन्हाळी विशेष रेल्वे ( Special Trains ) चालवितात. यंदाही प्रवाशांचा सुविधेसाठी मध्य रेल्वेने वर्ष २०२२ मध्ये आपल्या सुरू असलेल्या गाड्यांव्यतिरिक्त मध्य रेल्वेतून सुरू होणाऱ्या ६२६ उन्हाळ्यातील विशेष ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

v
v

मुंबई - उन्हाळ्याच्या सुट्या साजऱ्या करण्यासाठी आणि लग्न सराईचा सीजन असल्यामुळे बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने रेल्वेकडून गर्दीचे विभाजन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून दर वर्षी उन्हाळी विशेष रेल्वे ( Special Trains ) चालवितात. यंदाही प्रवाशांचा सुविधेसाठी मध्य रेल्वेने वर्ष २०२२ मध्ये आपल्या सुरू असलेल्या गाड्यांव्यतिरिक्त मध्य रेल्वेतून सुरू होणाऱ्या ६२६ उन्हाळ्यातील विशेष ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यंदा सर्वाधिक गाड्या मध्य रेल्वेवर - मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे कायमच आपल्या प्रवाशांना चांगल्या आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित दिशेने देण्यास वचनबद्ध आहे. विशेषतः उन्हाळ्यातील हंगामात प्रवाशांची सतत वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने वर्ष २०२२ मध्ये आपल्या विद्यमान गाड्यांव्यतिरिक्त मध्य रेल्वेतून सुरू होणाऱ्या ६२६ उन्हाळ्यातील विशेष ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. २०२१ आणि २०१९ मध्ये, उन्हाळ्यातील विशेष ट्रेनची संख्या अनुक्रमे ४३५ आणि ५४० होती. तर २०२० मध्ये कोविड साथीच्या कारणाने उन्हाळ्यात विशेष ट्रेन चालविण्यात आल्या नाहीत. एप्रिल ते जून, २०२२ मध्ये या ६२६ उन्हाळी विशेष रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे, नागपूर, साईनगर शिर्डी सारख्या मध्य रेल्वेतील स्टेशनपासून विविध स्थानासाठी चालविण्यात येत आहेत.

  • अशी आहे संख्या

• लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार, बलिया, गोरखपूर, मऊ, समस्तीपूर, बनारस तसेच थिवि दरम्यान ३०६ उन्हाळ्यातील विशेष रेल्वे (२ शिक्षक 'विशेष समाविष्ट)

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मनमाड, नागपूर, मालदा टाऊन तसेच रिवा दरम्यान उन्हाळ्यातील २१८ विशेष रेल्वे.

• पुणे आणि करमळी, जयपूर, दानापूर, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन तसेच कानपूर सेंट्रल दरम्यान उन्हाळ्यात १०० विशेष रेल्वे.

• नागपूर आणि मडगाव दरम्यान उन्हाळ्यातील २० विशेष रेल्वे.

• साईनगर शिर्डी आणि ढहर का बालाजी दरम्यान उन्हाळ्यातील २० विशेष रेल्वे.

• पनवेल आणि करमळी दरम्यान उन्हाळ्यातील १८ विशेष रेल्वे.

• दादर आणि मडगाव दरम्यान उन्हाळ्यातील ६ विशेष रेल्वे.

• लातूर आणि बिदर दरम्यान उन्हाळ्यातील २ विशेष रेल्वे.

हेही वाचा - Super Sheshnag Train : छत्तीसगडमधून नागपुरात सुपर शेषनाग रेल्वेने येणार 16 हजार टन कोळसा, रेल्वेची लांबी 3 किमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.