मुंबई - कोरोना विषाणूची लागण झालेले आज मुंबईत 1 हजार 44 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 33 हजार 835 वर पोहोचला आहे. तर 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 हजार 97 वर पोहोचला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 9 हजार 54 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. मुंबई कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 हजार 44 नवे रुग्ण आढळले असून, 32 जणांचा मृत्यू झाला आहे. 32 मृतांपैकी 15 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. एकूण मृतांपैकी 3 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. 12 जणांचे वय 60 वर्षावर तर 17 रुग्णांचे वय 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.
कोरोना रुग्ण आढळून आलेला विभाग कंन्टेटमेंट झोन म्हणून घोषित केला जातो. मुंबईत आजच्या दिवशी झोपडपट्टी आणि चाळीत 689 कंन्टेटमेंट झोन आहेत तर 2 हजार 908 इमारती किंवा इमारतीचा काही भाग सील करण्यात आला आहे. गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले अति जोखमीचे 7 हजार 764 रुग्णांचा शोध घेण्यात आला आहे. सध्या कोरोना केअर सेंटर 1 मध्ये अति जोखमीचे 16 हजार 719 रुग्ण असून, 54 हजार 677 रुग्ण मुंबईमधील सर्व सेंटरमध्ये भरती असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.