ETV Bharat / state

मुंबईत 2 हजार 587 कोरोनामुक्त, 1 हजार 240 नवे रुग्ण

आज (दि. 17 मे) मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या नोंदवली गेली आहे. 1 हजार 240 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 2 हजार 587 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : May 17, 2021, 8:10 PM IST

मुंबई - आज (दि. 17 मे) 1 हजार 240 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) 2 हजार 587 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 246 दिवस

मुंबईत आज 1 हजार 240 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 89 हजार 936 वर पोहोचला आहे. आज 48 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 308 वर पोहोचला आहे. 2 हजार 587 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 39 हजार 340 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 34 हजार 288 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 246 दिवस इतका आहे.

आतापर्यंत 59 लाख 16 हजार 245 चाचण्या

मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 77 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 312 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 17 हजार 640 तर आतापर्यंत एकूण 59 लाख 16 हजार 245 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळाने उडवली मुंबईची दैना, परिस्थिती सुधारण्यास अवधी लागेल - आदित्य ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.