ETV Bharat / state

मुंबईत आज 1 हजार 188 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू - मुंबई कोरोना बातमी

मुंबईत आज (दि. 6 मार्च) 1 हजार 188 नवे रुग्ण आढळून आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

file photo
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 6, 2021, 8:34 PM IST

मुंबई - मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात चार ते पाच दिवस मुंबईत एक हजाराच्या वर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दोन दिवस साडे आठशे रुग्ण आढळून आल्या. त्यानंतर सलग चार दिवस अकराशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. आज (दि. 6 मार्च) 1 हजार 188 नवे रुग्ण आढळून आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - प्रसिद्व अभिनेता आणि हास्य कलाकार जॉनी लिव्हर यांनी घेतली लस

कोरोना रुग्णांची आकडेवारी

मुंबईत आज (दि. 6) 1 हजार 188 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 32 हजार 204 वर पोहचला आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 495 वर पोहोचला आहे. 1 हजार 253 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 9 हजार 431 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 10 हजार 398 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 237 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 15 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 174 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 33 लाख 93 हजार 392 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा - आरोपपत्र रियाला अडकवण्यासाठी तयार केले गेलेले - वकील

हे विभाग हॉटस्पॉट

मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.

हेही वाचा - 'काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यात 2006 साली केलेला कृषी कायदाच केंद्र सरकारने आणलाय'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.