ETV Bharat / state

मुंबईत 1 हजार 103 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Mar 4, 2021, 9:57 PM IST

मुंबईत आज 1 हजार 103 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांचा आकडा 3 लाख 29 हजार 843 वर पोहोचला आहे.

corona update
कोरोना अपडेट

मुंबई - मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात चार ते पाच दिवस मुंबईत एक हजाराच्यावर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गेले दोन दिवस 855 व 849 इतके रुग्ण आढळून आले. आज (दि. 4) 1 हजार 103 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांची आकडेवारी

मुंबईत आज 1 हजार 103 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 29 हजार 843 वर पोहचला आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 487 वर पोहोचला आहे. 654 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 7 हजार 27 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 10 हजार 452 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 238 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 14 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 185 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 33 लाख 53 हजार 124 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट

मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.

रुग्णसंख्या वाढली

मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897, 21 फेब्रुवारीला 921, 22 फेब्रुवारीला 760, 23 फेब्रुवारीला 643, 24 फेब्रुवारीला 1 हजार 167, 25 फेब्रुवारीला 1 हजार 145, 26 फेब्रुवारीला 1 हजार 34, 27 फेब्रुवारीला 987, 28 फेब्रुवारीला 1 हजार 51, 1 मार्चला 855, 2 मार्चला 849, 3 मार्चला 1 हजार 121, 4 मार्चला 1 हजार 103 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - मुंबईत उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण, जाणून घ्या इतर ठिकाणची परिस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.