ETV Bharat / state

Hitech Railway Stations in Mumbai : मुंबईतील रेल्वे स्थानक होणार हायटेक, तब्बल ९४७ कोटींचा खर्च

विमानतळाच्या धर्तीवर मुंबई महानगरातील १९ रेल्वे स्थानके बनवण्याची ९४७ कोटी रुपयांची योजना आखली आहे. त्यांचे काम कागदोपत्री पूर्ण झाले होते. या स्थानकातील विकास कामाला डिसेंबर, २०२१ पासून सुरुवात हाेणार हाेती.पण, हा प्रकल्प रखडला आहे. आता नुकताच १९ रेल्वे स्थानकांचा ( Suburban Railway Stations ) पुर्नविकासाठी निविदा काढली आहे. त्यामुळे आता या स्थानकांचा विकास कामाला गती मिळणार असल्याचा, विश्वास मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून ( Mumbai Railway Development Corporation ) करण्यात आलेला आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन
मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन
author img

By

Published : Apr 11, 2022, 4:32 PM IST

मुंबई - विमानतळाच्या धर्तीवर मुंबई महानगरातील १९ रेल्वे स्थानके बनवण्याची ९४७ कोटी रुपयांची योजना आखली आहे. त्यांचे काम कागदोपत्री पूर्ण झाले होते. या स्थानकातील विकास कामाला डिसेंबर, २०२१ पासून सुरुवात हाेणार हाेती.पण, हा प्रकल्प रखडला आहे. आता नुकताच १९ रेल्वे स्थानकांचा पुर्नविकासाठी निविदा काढली आहे. त्यामुळे आता या स्थानकांचा विकास कामाला गती मिळणार असल्याचा, विश्वास मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून ( Mumbai Railway Development Corporation ) करण्यात आलेला आहे.

काय आहे योजना - मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पश्चिम व मध्य रेल्वेवरील १९ उपनगर रेल्वे स्थानकाचा ( Suburban Railway Stations ) विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विकासाचे कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे या स्थानकांच्या पुनर्विकास करण्यासाठी सुमारे ९४७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे. मात्र, या निधीचा वापर अद्यापही होताना दिसून येत नाही. या १९ रेल्वे स्थानकांमध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ आणि कसारा, असे एकूण ७ तर हार्बरवरील जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, अशा चार स्थानकांचा समावेश आहेत. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, जोगेश्वरी, कांदिवली यासह एकूण ८ स्थानकांचा अशा एकूण १९ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.

सात टप्यात हाेणार विकास - या १९ स्थानकांचा विकास सात टप्यात हाेणार आहे. पहिल्या टप्यात घाटकाेपर, विक्राेळी, भांडुप, दुसऱ्या टप्प्यात मुंलुड, डाेंबिवली, तिसऱ्या टप्यात नेरळ, कसारा त्यानंतर जीबीटी नगर, चेंबुर, गाेवंडी आणि मानखुर्द, पाचव्या टप्प्यात मुंबई सेंट्रल आणि सांताक्रुझ, सहाव्या टप्यात कांदिवली, मिरा राेड आणि सातव्या टप्यात भाईंदर, वसई राेड,नालासाेपारा स्थानकाचा विकास करण्यात येणार आहे. ३६ महिन्यांत विकासाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून ( Mumbai Railway Development Corporation ) देण्यात आली आहे.

हेही वाचा - Vehicles vandalized in Mankhurd : मानखुर्द येथे रात्री तरुणांनी फोडल्या गाड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.