ETV Bharat / state

राज्यात गेल्या 24 तासात 485 पोलीस कोरोनाबाधित.. - महाराष्ट्र पोलीस कोरोना रुग्णसंख्या

लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस दलात कोरोनाबाधितांचा संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 485 पोलीस कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Sep 12, 2020, 7:55 PM IST

मुंबई - राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 485 पोलीस कोरोनाबाधित झाले असून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे कर्तव्य बजावताना आतापर्यंत राज्यात 186 पोलिसांचा मृत्यू झाला असून यामध्ये 16 पोलीस अधिकारी तसेच 170 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 18 हजार 890 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 2,050 पोलीस अधिकारी तर 16 हजार 840 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 3,729 पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेत असून यात 461 पोलीस अधिकारी तर 3,268 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 14 हजार 975 पोलीस कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून यामध्ये 1,573 पोलीस अधिकारी तर 13 हजार 402 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - नौदल अधिकारी मारहाण; पोलीस सहआयुक्तांच्या आश्वासनानंतर भाजपाचे आंदोलन मागे

आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 52 हजार 296 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 860 जणांवर कारवाई केली आहे. राज्यभरात 355 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 894 आरोपींना अटक केली आहे. राज्यात अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत 34 हजार 690 आरोपींना अनधिकृत वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 96 हजार 138 वाहने जप्त केली असून तब्बल 24 कोटी 81 लाख 95 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 89 पोलीस जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 73 घटना घडल्या आहेत.

हेही वाचा - 'मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसला'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.