मुंबई - राज्यात आज (दि. १९ ऑगस्ट) ५ हजार २२५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर १५४ मृत्यूंची नोंद झाली असून ५ हजार ५५७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात ५७ हजार ५७९ सक्रिय रुग्ण
राज्यात गुरुवारी (दि. १९ ऑगस्ट) ५ हजार ५५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख १४ हजार ९२१ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ५ हजार २२५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार ५६७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी १७ लाख १४ हजार ९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ११ हजार ५७० (१२.४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख २९ हजार ४७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५७ हजार ५७९ सक्रिय रुग्ण आहेत.
मृत्यूदर २.११ टक्के
१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १००, १७ ऑगस्टला ११६, १८ ऑगस्टला १५८, १९ ऑगस्टला १५४ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.११ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - २८२
रायगड - १०५
पनवेल पालिका - ४८
अहमदनगर - ७६२
पुणे - ६२३
पुणे पालिका - २७०
पिपरी चिंचवड पालिका - १९१
सोलापूर - ६२५
सातारा - ७०७
कोल्हापूर - ११७
सांगली - ४३५
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ८१
सिंधुदुर्ग - ८४
रत्नागिरी - ११०
उस्मानाबाद - ७९
बीड - १४३
हेही वाचा - Mumbai Vaccination : मुंबईत आज, उद्या लसीकरण बंद; परवा राहणार सुरू