मुंबई - कोरोना रुग्ण सापडण्याचे राज्यातील प्रमाण कमी होत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. राज्यात आज ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज ११७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे एकूण ४४, ८०४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०७ टक्के
राज्यात आज ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०७ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४४,८०४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,०६,५१९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.