मुंबई - राज्यात आज 53 हजार 605 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 864 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 50 लाख 53 हजार 336 एवढी झाली आहे. तसेच आज 82 हजार 266 रुग्ण कोरणामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 43 लाख 47 हजार 592 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद -
मुंबई महानगरपालिका 2664, ठाणे 550, ठाणे मनपा 487, नवी मुंबई 267, कल्याण डोंबिवली 558, मीराभाईंदर 263, पालघर 628, वसई विरार मनपा 934, रायगड 821, पनवेल मनपा 281, नाशिक 1700, नाशिक मनपा 2224, अहमदनगर 2915, अहमदनगर मनपा 465, धुळे 185, जळगाव 814, नंदुरबार 228, पुणे 4352, पुणे मनपा 2977, पिंपरी चिंचवड 2033, सोलापूर 1986, सोलापूर मनपा 385, सातारा 2323, कोल्हापुर 1578, कोल्हापूर मनपा 288, सांगली 1648, सिंधुदुर्ग 630, रत्नागिरी 734, औरंगाबाद 699, औरंगाबाद मनपा 484, जालना- 576, हिंगोली 101, परभणी 382, परभणी मनपा 113, लातूर 853, लातूर मनपा 226, उस्मानाबाद 560, बीड 1,367, नांदेड मनपा 158, नांदेड 324, अकोला 191, अमरावती मनपा 200, अमरावती 1085, यवतमाळ 652, बुलढााणा 1547, वाशिम 583, नागपूर 1758, नागपूर मनपा 2149, वर्धा 818, भंडारा 576, गोंदिया 306, चंद्रपूर 1228, चंद्रपूर मनपा 441, तर गडचिरोलीत 419 रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा - कंगनाला कोरोनाची लागण, म्हणाली- मी कोरोनाला नष्ट करेन, आपण याचा सामना करु