मुंबई - कोरोना विषाणूचे मुंबईत गुरूवार (दि. 2 जुलै) नवे 1 हजार 554 रुग्ण आढळून आले असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 80 हजार 262 वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा 4 हजार 686 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 5 हजार 903 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 50 हजार 694 वर पोहचला आहे. मुंबईत सध्या 24 हजार 882 सक्रिय रुग्णांवर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 63 टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नव्याने 1 हजार 554 रुग्ण आढळून आले आहेत. तर 57 जणांचा मृत्यू झाला आहे. 57 मृत्यूपैकी 43 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 पुरुष आणि 26 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 4 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 34 जणांचे वय 60 वर्षावर तर 19 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.
मुंबईमधून आज 5 हजार 903 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 50 हजार 694 वर पोहचला आहे. मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 80 हजार 262 वर पोहचला आहे. त्यापैकी 4 हजार 686 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 50 हजार 694 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 24 हजार 882 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर 63 टक्क्यांवर
मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 63 टक्क्यांवर पोहचला आहे. 25 जून ते 1 जुलैपर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.72 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 41 दिवस इतका आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा 754 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 253 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सिल करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 9 हजार 172 अति जोखमीच्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. सध्या कोरोना केअर सेंटरमध्ये 13 हजार 458 अति जोखमीच्या संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत 1 लाख 14 हजार 111 अति जोखमीच्या संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 3 लाख 39 हजार 796 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - लांबून येणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीतून सूट