मुंबई - शनिवारी (दि. 26 जून) मुंबईत 1 लाख 54 हजार 226 लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामुळे मुंबईने 50 लाख लसीचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत 50 लाख 93 हजार 485 लसीचे डोस देण्यात आले आहेत.
लसीकरण मोहीम
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मेपासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू झाले असले तरी राज्य सरकारच्या निर्णयानुसार 30 ते 44 वयोगटातील लसीकरण केले जात आहे. तसेच परदेशात जाणारे विद्यार्थी, कामानिमित्त परदेशात जाणारे नागरिक, ऑलम्पिकसाठी जाणारे खेळाडूंचे लसीकरण केले जात आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जात आहे.
लसीकरणाची आकडेवारी
- आरोग्य कर्मचारी - 3 लाख 16 हजार 304
- फ्रंटलाईन वर्कर - 3 लाख 72 हजार 115
- ज्येष्ठ नागरिक - 13 लाख 95 हजार 499
- 45 ते 59 वय - 14 लाख 87 हजार 803
- 18 तर 44 वय - 15 लाख 13 हजार 560
- स्तनदा माता - 3 हजार 224
- परदेशी शिक्षण विद्यार्थी - 4 हजार 964
- मानसिक रुग्ण - 16
- एकूण - 50 लाख 93 हजार 485