ETV Bharat / state

माथेरान राणी सुसाट; अवघ्या दोन महिन्यात ७८ हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी केला प्रवास!

माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने शटल सेवेसह हे ठिकाण एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

matheran mini train
माथेरानची मिनी ट्रेन
author img

By

Published : Jun 8, 2022, 7:23 PM IST

मुंबई - पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेली मिनी ट्रेनला पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन महिन्यात माथेरानच्या राणीतून ७८ हजार ५७७ पेक्षा जास्त पर्यटकांनी प्रवास केला आहे. त्यातून मध्य रेल्वेला ५४ लाख ५९ हजार रुपये महसूल मिळाले आहेत.

माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने शटल सेवेसह हे ठिकाण एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.मध्य रेल्वेने एप्रिल ते मे २०२२ या कालावधीत ७८,५७७ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९,११५ पॅकेजेसची वाहतूक केली, तर अमन लॉज आणि माथेरान दरम्यान एप्रिल ते मे २०२१ या कालावधीत ५,७३९ प्रवाशांची आणि २,९३१ पॅकेजेसची वाहतूक केली गेली.

पर्यटकांना आरामदायी प्रवास देण्यासोबतच, या सेवा स्वस्त आणि जलद साहित्याची वाहतूक करण्यासही मदत करतात. यामुळे एप्रिल ते मे २०२२ या कालावधीत रु. ५४.५९ लाखांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये ५३.८ लाख रुपये प्रवासी महसूल आणि ७४,११७ रुपयांच्या पार्सल महसुलाचा समावेश आहे. त्या तुलनेत एप्रिल - मे २०२१ या कालावधीतील २.९४ लाख रुपये महसुलात २.७० लाख रुपये प्रवासी महसूल तर पार्सलमधून २४ हजार ४७५ रुपये महसूल प्राप्त झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.