ETV Bharat / state

मुंबई महापालिकेने केला 'मास्क' न वापरणाऱ्यांकडून 27 लाख 48 हजारांचा दंड वसूल - mumbai mask fine news

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याचे सरकारने नियम काढला आहे. हे नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येते. कोरोनाकाळातील 5 महिन्याच्या कालावधीत 9 हजार 954 मास्क न वापरणाऱ्या मुंबईकरांकडून 27 लाख 48 हजारांचा दंड वसूल करण्यात आले आहे.

mask
मास्क
author img

By

Published : Sep 3, 2020, 8:21 PM IST

मुंबई - मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले असून मास्क न लावणाऱ्या लोकांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार गेल्या 5 महिन्यात 2 हजार 798 मुंबईकरांवर पालिकेने कारवाई करत 27 लाख 48 हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच 'फेसमास्क' योग्यरित्या लावणाऱ्या 9 हजार 954 व्यक्तींना समज म्हणजेच वॉर्निंग देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर 'मास्क' लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर रुपये एक हजारपर्यंत दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार बृहन्मुंबई महापालिकेद्वारे मास्क वापरण्या विषयक जनजागृती सातत्याने करण्यासोबतच याबाबत नियम न पाळणाऱ्या किंवा चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई 9 एप्रिलपासून नियमितपणे करण्यात येत आहे. 9 एप्रिल ते 31ऑगस्ट, 2020 दरम्यान मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या 2 हजार 798 नागरिकांकडून 27 लाख 48 हजार 700 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त फेसमास्क योग्यरित्या न लावणाऱ्या 9 हजार 954 व्यक्तींना समज देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आली आहे.

या विभागात सर्वाधिक दंड वसूलीत 'हे' आहेत 'टॉप थ्री' विभाग

9 एप्रिल ते 31 ऑगस्ट या सुमारे 5 महिन्यांच्या कालावधी दरम्यान सर्वाधिक म्हणजेच रुपये 5 लाख 4 हजार इतकी दंड वसूली ही 'के पश्चिम' विभागाद्वारे करण्यात आली आहे. त्या खालोखाल रुपये 4 लाख 21 हजार इतका दंड 'आर दक्षिण' विभागात तर रुपये 4 लाख 8 हजार 500 इतका दंड 'सी' विभागाद्वारे वसूल करण्यात आला आहे.

मे महिन्यात सर्वाधिक दंड वसुली

9 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2020 या सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीदरम्यान सर्वाधिक म्हणजेच 9 लाख 45 हजार रुपये एवढा दंड 'मे, 2020' या महिन्यात वसूल करण्यात आला आहे. तसेच 5 लाख 88 हजार इतका दंड जून महिन्यात, तर रुपये 4 लाख 82 हजार 700 इतका दंड 'एप्रिल' महिन्यात वसूल करण्यात आला आहे. मे महिन्यात विनामास्क विषयक कारवाई अंतर्गत 953 व्यक्तींकडून दंड वसूली करण्यात आली. तर जूनमध्ये 598 प्रकरणी आणि एप्रिलमध्ये 523 प्रकरणी दंड वसूली करण्यात आली आहे.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्‍या ठिकाणी वावरताना 'फेसमास्क' वापरावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेद्वारे सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. यानंतरही 'मास्क' वापरणे टाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जनजागृती व दंडात्मक कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती होऊन आता सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कारवाईचा सकारात्मक परिणाम होऊन काही प्रमाणात कोरोनाचा प्रसार रोखण्‍यातही मदत होत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी घराबाहेर पडताना आवर्जून मास्क घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे.

हेही वाचा - मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे; तक्रारींचे प्रमाण मात्र कमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.