मुंबई - राज्यात आज 13 हजार 395 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांचा एकुण आकडा 14 लाख 93 हजार 884 वर पोहोचला आहे. झाली. राज्यात 15 हजार 575 जण आज कोरोनामुक्त झाले आहेत, तर 358 कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 12 लाख 12 हजार 18 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.13 टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या 2 लाख 41 हजार 986 कोरोनाग्रस्त रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 74 लाख 4 हजार 231 नमुन्यांपैकी 14 लाख 93 हजार 884 नमुने पॉझिटिव्ह म्हणजेच 20.18 टक्के आले आहेत. राज्यात 22 लाख 84 हजार 204 लोक गृह विलगिकरणात आहेत. सध्या 25 हजार 321 लोक संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज 358 बाधितांचा मृत्यू झाला असून राज्यात आजपर्यंत एकूण 39 हजार 430 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के इतका झाला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आज नोंद झालेल्या एकूण 358 मृत्यूंपैकी 187 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 55 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 166 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. 166 मृत्यूंपैकी पुणे 35, ठाणे 28, वर्धा 18, नागपूर 12, परभणी 6, बीड 3, कोल्हापूर 2, नाशिक 2, उस्मानाबाद 2, सातारा 2, नांदेड 2, रत्नागिरी 2, जळगाव 1 आणि सांगली 1 असे आहेत.
हेही वाचा - घरात मानसिक त्रास, बाहेर चोरट्यांचा हल्ला; राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट