मुंबई - राज्यात मागील 24 तासांत 10 हजार 259 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची 1 लाख 85 हजार 270 एवढी झाली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (दि. 17 ऑक्टोबर) दिली.
राज्यात आज 14 हजार 298 रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 13 लाख 58 हजार 606 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.65 टक्क्यांवर पोहोचले आहे. आजही नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 80 लाख 69 हजार 100 नमुन्यांपैकी 15 लाख 86 हजार 321 नमुने पॉझिटिव्ह (19.66 टक्के) आले आहेत. राज्यात 23 लाख 95 हजार 552 लोक गृह विलगीकरणात आहेत. सध्या 23 हजार 749 लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज 250 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण 41 हजार 965 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.65 टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण 250 मृत्यूंपैकी 152 मृत्यू मागील 48 तासांतील तर 47 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 51 मृत्यू एक आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
हेही वाचा - मुंबई लोकलसेवा : सत्ताधारी अन विरोधकांमध्ये शह-काटशहचे राजकारण