ETV Bharat / state

'कायद्याच्या चौकटीत राहून नववर्षाचं स्वागत करा'; 'थर्टी फर्स्ट'साठी मुंबई पोलिसांची फौज तैनात, हुल्लडबाजांना दिला दम - थर्टी फर्स्ट बंदोबस्त

Thirty First Celebration Mumbai : मुंबई पोलिसांनी 'थर्टी फर्स्ट'च्या सेलिब्रेशनला गालबोट लागू नये म्हणून कंबर कसली आहे. 'थर्टी फर्स्ट'च्या बंदोस्तासाठी मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत.

Thirty First Endowment
पोलीस बंदोबस्त
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 9:22 PM IST

Updated : Dec 30, 2023, 9:11 AM IST

पोलीस बंदोबस्ताविषयी माहिती देताना सहपोलीस आयुक्त

मुंबई Thirty First Celebration Mumbai : मायानगरीत 2023 वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असतात. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) सज्ज आहेत. 'थर्टी फर्स्ट'वेळी मुंबई आणि परिसरात २२ पोलीस उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २ हजार पोलीस अधिकारी आणि ११ हजार ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे.

मुंबई पोलीस सज्ज : सहपोलीस आयुक्तांनी सांगितले की, 'एसआरपीएफ'ची २० प्लाटून व्यतिरिक्त कायदा आणि सुव्यवस्थेची १५ प्लाटून, क्यूआरटी, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह अन्य बंदोबस्त 'थर्टी फर्स्ट'साठी रस्त्यावर उतरणार आहे. ३१ डिसेंबर आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई शहरातील जास्त संख्येनं लोक जमण्याची ठिकाणं 'गेट वे, मरिन ड्राइव्ह, चौपाटी आणि बॅण्डस्टॅण्ड' ही आहेत. तिकडं वेगळ्या सुरक्षेच्या आयोजनासह बेरिकेटिंग्स आणि पब्लिक अलर्ट सिस्टम (SRPF) आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व नियोजन करण्यात आलंय. मुंबई शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि जंक्शन्स आहेत, तिथं नाकाबंदीचे नियोजन करण्यात आलंय. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातून ५ हजार सीसीटीव्हींच्या माध्यमातून महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुविधा : जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्यांना शोधून योग्य ती 'प्रोव्हेंटिव्ह कारवाई' करण्यात येईल. यासाठी मुंबई पोलिसांची पूर्ण आखणी करण्यात आलेली आहे. मुंबई शहरात पेट्रोलिंगसाठी ३५० बिटमार्शल आणि ५०० पेक्षा जास्त मोबाईल व्हॅन असून, त्यात ९३ निर्भया पथकांचा देखील समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या कायदा आणि सुवव्यस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी मुंबईकरांना आवाहन केलं आहे की, मुंबईकरांनी आनंदानं नव्या वर्षाचं स्वागत करावं. ज्यांना मदत हवी आहे ते मुंबई पोलिसांच्या १०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. आम्ही तत्काळ त्यांच्या मदतीसाठी हजर राहू.

पोलिसांकडून बंदोबस्ताचं नियोजन : ३१ डिसेंबरला नववर्षागमन निमित्तानं मुंबईतही महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणं, हॉटेल, शॉपिंग मॉल यासारख्या आस्थापनांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. नागरिक जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करतात. मुंबई शहरामध्ये नववर्ष आगमनानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलं आहे.

सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त : नागरिकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे साजरा करता यावं याकरिता मुंबई पोलीस दलाकडून २२ पोलीस उपआयुक्त, ४५ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह २०५१ पोलीस अधिकारी आणि ११ हजार ५०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत महत्त्वाच्या ठिकाणी एस.आर.पी.एफ. प्लाटून, क्यूआरटी टीम, आरसीपी, होमगार्डस् अशा चोख पोलीस बंदोबस्ताचं आयोजन करण्यात आलं आहे. या दिवशी मुंबई पोलिसांतर्फे ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार असून, गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग तसेच फिक्स पॉईंट नेमण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि "ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह" विरोधात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच विविध आस्थापने आणि गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

कायद्याच्या चौकटीत राहून नववर्षाचे स्वागत करा : मद्य पिऊन वाहन चालवणारे व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे व्यक्ती, महिलांची छेडछाड करणारे व्यक्ती, अनधिकृत मद्य विक्री करणारी आस्थापने, अंमली पदार्थ विक्री अथवा सेवन यासारखी बेकायदेशीर कृत्य करणारे व्यक्ती यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी नियमांचं भान ठेवून नववर्ष आगमन उत्साहानं आणि जल्लोषात साजरं करावं, असं आवाहन मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

हेही वाचा:

  1. INDIA आघाडी तुटण्याच्या मार्गावर? शिवसेना महाराष्ट्रात २३ जागांवर ठाम, ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये एकला चलोचा नारा
  2. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिसणार का महाराष्ट्राचा चित्ररथ? प्रशासनानं दिलं 'हे' उत्तर
  3. लोकसभेसाठी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये धुसफुस

Last Updated : Dec 30, 2023, 9:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.