ETV Bharat / state

Monsoon session 2023 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सुप वाजले, हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून - गृहनिर्माण पुनर्विकास

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सुप आखेर आज वाजले. या अधिवेशनात विरोधक अतिशय निष्प्रभ होते. एकूणच अधिवेशनावर सत्ताधारी गटाचा कब्जा असल्याने एकूण अधिवेशनातील केवळ वीस मिनिटे कामकाजातील वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अखेरच्या दिवशी मांडण्यात आलेल्या लक्षवेधींवर चर्चा झालीच नाही. ( Monsoon session 2023 )

Monsoon session 2023
पावसाळी अधिवेशन 2023
author img

By

Published : Aug 4, 2023, 7:46 PM IST

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची अखेर आज सांगता झाली. या अधिवेशनावर सत्ताधारी गटाचा वरचष्मा असल्याचे पहिल्या दिवसापासून जाणवले. अधिवेशन संपता समता विरोधी पक्षनेत्याची केवळ औपचारिक निवड करण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण अधिवेशनात विरोधी पक्षनेता विना काम करण्यात आले त्यामुळे विरोधकांकडून सरकारला घेण्याचा अनेकदा प्रयत्न झाला असला तरी त्यात फारसे यश आले नाही. आणि सत्ताधारी फ्लोअर मॅनेजमेंट करण्यात यशस्वी ठरल्याचे यावेळी दिसून आले.

या अधिवेशनात गृहनिर्माण पुनर्विकास, आरोग्य शिक्षण, कायदा सुव्यवस्था, पूर परिस्थिती तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा होऊन शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला. विधानसभेत झालेले कामकाजविधानसभेत एकूण बैठकींची संख्या 13 असून प्रत्यक्ष झालेले कामकाज 109 तास 21 मिनिटे होते. अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ वीस मिनिटे असल्याने पहिल्यांदाच इतका कमी वेळ वाया गेल्याचे दिसून आले त्यामुळे, रोजचे सरासरी कामकाज आठ तास 24 मिनिटे इतके झाले.

विधानसभेकडे सदस्य आमदारांनी अनेक प्रश्न दिले होते यापैकीप्राप्त प्रश्नांची संख्या ६६७१,होती त्यापैकी 313 प्रश्न स्वीकृत करण्यात आले. आणि, उत्तरीत झालेले प्रश्न 47 होते. अल्प सूचना प्रश्न प्राप्त सूचना चार होत्या, त्यापैकी दोन अस्विकृत करण्यात आल्या तर दोन समिती करण्यात आल्या अल्पकालीन चर्चा प्राप्त दोन झाल्या . त्यापैकी एक अल्पकालीन चर्चा मान्य करण्यात येऊन त्यावर चर्चा झाली. प्रश्नाच्या उत्तरातून उद्भवलेल्या प्राप्त सूचना 19 होत्या त्यापैकी मान्य सूचना 16 होत्या आणि दोन सूचनांवर चर्चा झाली.

सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना 117 होत्या त्यापैकी तेरा सूचना मान्य करण्यात आल्या आणि पाच सूचनांवर चर्चा झाली. अशासकीय ठराव 267 पैकी मान्य सूचना 189 मात्र कोणत्याही अशासकीय ठरावावर चर्चा झाली नाही. अभिनंदन पर केवळ एकच ठराव सभागृहात आला त्यावर चर्चा झाली. लक्षवेधीच्या एकूण 1890 सूचना प्राप्त झाल्या त्यापैकी स्वीकृत सूचना 515 तर 98 सूचनांवर चर्चा झाली. नियम 97 अन्वये प्राप्त सूचना 110 होत्या मात्र यापैकी एकही सूचना मान्य झाली नाही त्यामुळे कोणत्याच सूचनेवर चर्चा झाली नाही.

शासकीय विधेयके विधानसभा पुरस्थापित 24 विधेयके होती. त्यापैकी सोळा विधेयके संमत झाली विधानपरिषद संमत तीन विधेयके आहेत. अशासकीय विधेयके प्राप्त सूचना चार मान्य सूचना तीन असून पुरस्थापित सात सूचना होत्याशासकीय ठराव निरंक आहेत तर नियम 293 अन्वय प्रस्ताव प्राप्त सूचना चार मान्य सूचना चार चर्चा झाली ती अशासकीय ठराव सूचना 267 प्राप्त झाल्या त्यापैकी 189 सूचना मान्य झाल्या.

मात्र कोणत्याही सूचनांवर चर्चा झाली नाही सन्माननीय सदस्यांची उपस्थिती जास्तीत जास्त उपस्थिती 91.43 टक्के कमीत कमी उपस्थिती ५५. ८६ टक्के एकूण सरासरी उपस्थिती 82.90 टक्के अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चा झाली . विधिमंडळाचे पुढील अधिवेशन 7 डिसेंबर 2023 पासून नागपूर येथे घेण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष यांनी घोषित केले.

हेही वाचा :

  1. Monsoon session 2023 : महाराष्ट्रात खरा गद्दार कोण ? अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांचा सवाल
  2. Monsoon session 2023 : मुंबई महापाल‍िका रुग्णालयातील औषध खरेदीची चौकशी - मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.